Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmer Protest : कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक? अकोल्यात कर्जमाफीच्या ‘फसव्या’ अध्यादेशाची होळी; राज्यभर आंदोलनाचा इशारा

कर्जमाफीसंदर्भातील शासन आदेशातील जाचक अटींमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत किसान सभेने सरकारवर जोरदार टीका केली आहे. अकोल्यात कर्जमाफीच्या कथित फसव्या अध्यादेशाची होळी करण्यात आली असून राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शेतकरी हिताच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 04, 2026 | 12:29 PM
कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक? अकोल्यात कर्जमाफीच्या ‘फसव्या’ अध्यादेशाची होळी; राज्यभर आंदोलनाचा इशारा

कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक? अकोल्यात कर्जमाफीच्या ‘फसव्या’ अध्यादेशाची होळी; राज्यभर आंदोलनाचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • शासन आदेशाविरोधात किसान सभा आक्रमक
  • कर्जमाफीतील अटींवर संताप
  • राज्यभर आंदोलनाचा इशारा
पोपट पिटेकर,अहिल्यानगर : सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अटी आणि शर्ती लागू करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. “ही कर्जमाफी आजवरच्या सर्व कर्जमाफ्यांमध्ये सर्वात कडक अटी असलेली आणि खूप कमी शेतकऱ्यांना लाभ देणारी ठरणार आहे. निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा करण्याचे आश्वासन द्यायचे आणि आता प्रत्यक्षात बहुसंख्य शेतकऱ्यांची केवळ ५० हजारांवर बोळवणूक करायची, ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे,” असा घणाघाती आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन? अनधिकृत बांधकामावर जिल्हाधिकाऱ्यांचा बडगा; बेबी डिसुझा रस्त्यावरील कामावर कारवाईचे आदेश

या फसव्या निर्णयाच्या निषेधार्थ किसान सभेने राज्यभर शासन आदेशाची होळी करण्याची हाक दिली होती. यानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील महात्मा फुले चौकात शेतकऱ्यांनी एकत्र येत कर्जमाफी अध्यादेशाचे दहन केले. उद्या आणि परवा सलग दोन दिवस राज्यभर हे होळी आंदोलन सुरू राहणार आहे.

किसान सभेने आक्षेप घेतलेल्या जाचक अटी

२०१९ च्या कर्जदारांवर अन्याय:- २०१९ मध्ये कर्जमाफी घेतलेले तब्बल ३२ लाख २९ हजार शेतकरी जर यावेळी थकीत असतील, तरी त्यांना केवळ ५० हजार रुपयांच्या मर्यादेतच कर्जमाफी दिली जाणार आहे.

नियमित कर्जदारांची बोळवणूक: नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही केवळ ५० हजार रुपयेच मिळणार असून, त्यांना किमान दोन वर्षे नियमित कर्जदार असण्याची कडक अट घालण्यात आली आहे.

सहकार क्षेत्रातील कर्मचारी वंचित: अत्यंत अल्प पगारावर काम करणाऱ्या सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या कर्जमाफीतून पूर्णपणे वगळण्यात आले आहे.

Sanjay Raut PC: विधान परिषद आता सभागृह नाही तर ‘डम्पिंग ग्राउंड’ झालेय! संजय राऊतांचा थेट घणाघात

“निवडणुकीपूर्वी २ लाखांची कर्जमाफी जाहीर करून आता मात्र अटींचा खोळंबा घालत बहुतांश शेतकऱ्यांना ५० हजारांत गुंडाळण्याचा सरकारचा हा डाव संतापजनक आहे.” अशी प्रतिक्रिया डॉ. अजित नवले (राज्य सरचिटणीस, किसान सभा) यांनी दिली.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या

१. कर्जमाफीसाठी घालण्यात आलेल्या सर्व जाचक अटी तातडीने रद्द कराव्यात.
२. सर्व शेतकऱ्यांना कोणतीही अट न ठेवता संपूर्ण कर्जमाफी द्यावी.
३. नियमित कर्जदार शेतकरी, शेडनेट, पॉलीहाऊस आणि कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व प्रकारची पीक व शेती सुधारणा कर्जे माफ करावीत.

अकोले येथील आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या या फसवणुकीविरोधात संपूर्ण राज्यात तीव्र संताप व्यक्त होत असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा किसान सभेने दिला आहे.

Web Title: Farm loan waiver farmers anger kisan sabha protest akola government conditions news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • Akola
  • Farmer Protest
  • maharashtra

संबंधित बातम्या

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई
1

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई

विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणारे सदाभाऊ खोतच ‘गुंडाभाऊ’, विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागा; काँग्रेसची मागणी
2

विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणारे सदाभाऊ खोतच ‘गुंडाभाऊ’, विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागा; काँग्रेसची मागणी

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव
3

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

Akola water crisis : धरणातील पाणी पातळी खालावल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलले!
4

Akola water crisis : धरणातील पाणी पातळी खालावल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.