तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या चिचोली ते देव्हाडी या २१ किलोमीटरच्या राज्यमार्गावर कंत्राटदाराचा मनमानी कारभार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष आजही कायम आहे. शासनाच्या हायब्रिड अॅन्यूटी योजनेंतर्गत सुमारे ७५ कोटी रुपयांच्या भरभक्कम निधीतून तयार करण्यात आलेल्या या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर आपले अपयश झाकण्यासाठी बांधकाम कंपनीने एक वर्षांपूर्वी चक्क डांबराचे पट्टे मारून थातूरमातूर दुरुस्ती केली होती. मात्र, वर्षभराचा कालावधी उलटूनही ही समस्या ‘जैसे थे’ असून नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सदर रस्ता भंडारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. या रस्त्याचे आरसीसी काँक्रीटीकरण २०२० मध्ये पूर्ण झाले असून, ‘शिवालय भंडारा-नागपूर महामार्ग कन्स्ट्रक्शन’ कंपनीला या रस्त्याची १० वर्षे देखभाल व दुरुस्ती करायची आहे. बावनकर चौक ते महावितरण कार्यालयापर्यंतच्या भागात खराब झालेल्या काँक्रिटवर नव्याने काँक्रिटीकरण करण्याऐवजी कंत्राटदाराने वर्षभरापूर्वी डांबराचे थर देऊन तात्पुरती मलमपट्टी केली होती. परंतु, या चुकीच्या दुरुस्तीमुळे रस्ता पूर्ववत होण्याऐवजी त्याची
दर पावसाळ्यात पाण्याचे डबके
विशेषतः, तुमसर तहसील कार्यालय ते सुभाषचंद्र बोस चौकादरम्यान पावसाळ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. या समस्येबाबत १३ ऑगस्ट २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रीतसर तक्रार करण्यात आली होती. त्यानतर प्रशासनाने केवळ डांबराचा लेप लावून मोकळे होण्याचे काम केले. मात्र, आज एक वर्ष उलटूनही या ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नाही.
दुरवस्था अधिकच वाढली आहे.
पावसाळ्यात रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे शाळकरी विद्यार्थी व पादचाऱ्यांच्या अंगावर चिखल-पाणी उडत असल्याने दररोज नागरिक आणि वाहनचालकांमध्ये भांडणे होत असून अपघातांचा धोका वाढला आहे. वर्षभरापासून सुरू असलेल्या या अनास्थेविरोधात थेट सार्वजनिक बांधकाम
प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. १ वर्षापूर्वी केलेल्या त्या थातूरमातूर दुरुस्तीचा तीव्र निषेध नोंदवत, रस्त्याची नियमानुसार शास्त्रीय पद्धतीने दुरुस्ती करण्याची, पाणी साचणाऱ्या ठिकाणी कायमस्वरूपी ड्रेनेज लाईन उभारण्याची आणि कंत्राटदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आहे.






