न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरमुळे नक्की काय होते
न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर हे मेंदू, पाठीचा कणा आणि मज्जासंस्थेवर परिणाम करतात, ज्यामुळे मुलांच्या वाढीवर आणि एकूण आरोग्यावर त्याचा लक्षणीय परिणाम होऊ शकतो. पालकांनी काय सावधगिरी बाळगावी आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी या लेखाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले आहे.
डॉ. शिजी चालिपत, पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट, अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रेन, पुणे यांनी न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ही स्थिती नक्की काय असते आणि मुलांमध्ये त्याचा कसा परिणाम होतो याबाबत जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे काय?
न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर ही एक अशी स्थिती आहे जी एखाद्याच्या मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम करते. यात मेंदू, पाठीचा कणा आणि नसा यांचा समावेश असू शकतो. कालांतराने, आपल्या मुलाच्या विचार करण्याच्या, वागण्याच्या किंवा विशिष्ट हालचालींवर त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो. काही मुले या न्यूरोलॉजिकल विकारांसह जन्माला येतात जे अनुवांशिक घटकांमुळे किंवा जन्मादरम्यान गंभीर गुंतागुंतीमुळे उद्भवू शकतात.
तर काहींना संसर्ग किंवा दुखापतींसारख्या कारणांमुळे ही समस्या उद्भवू शकते. ही स्थिती बिघडण्यापूर्वीच सुरुवातीच्या टप्प्यावर त्याचा शोधणे महत्त्वाचे ठरते कारण ते तुमच्या मुलांच्या जीवनाच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम करते. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर हे मुलांच्या बोलण्यावर, हालचालींवर, विकासावर, शिक्षणावर आणि त्यांच्या भावनिक क्षमतेवरही परिणाम करू शकतात. जर तुमच्या मुलामध्ये अशी असामान्य चिन्हे आढळून आली तर तुम्ही ताबडतोब न्यूरोलॉजिस्टला भेटायला घेऊन जा. ही लक्षणे वेळीच ओळखणे आणि उपचार करणे गरजेचे आहे.
सकाळीच उपाशीपोटी बदाम आणि बेदाणे खाण्याने मिळतात Magical फायदे, जाणून घ्या तथ्य
न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर अशी आहेत लक्षणे
न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची लक्षणे नेमकी काय आहेत
आकडी/दौरे: लहान मुलांमध्ये किंवा नवजात शिशुंमध्ये क्वचितच आकडी येते तरीही पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. धक्का बसणे, लाळ येणे, पडणे, शरीर जड होणे, भान हरपणे, आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव न होणे, शारीरक लय नसणे यासारखी लक्षणे शोधावीत. हे अचानक आलेले झटके त्यांच्या मेंदूतील असामान्य विद्युत क्रियांचे संकेत देतात.
एकटक पाहणे किंवा प्रतिसाद न देणे: जेव्हा तुमचे मूल तुमच्याकडे एकटक पाहते किंवा तुम्ही त्यांना बोलवता तेव्हा ते प्रतिसाद देत नाही. हे देखील एक महत्त्वाचे लक्षण ठरु शकते. ही उदाहरणे अनेकदा पालकांच्या लक्षात येत नसतील परंतु अशा वेळी वेळ न दवडता तुमच्या डॉक्टरांशी भेट घेऊन ताबडतोब ती दूर करणे आवश्यक आहे.
बोलताना अडखणे/ बोबडी वळणे: काही शब्द उच्चारण्यात अडचण येणे, समोरची व्यक्ती काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे हे समजणे किंवा वाक्ये तयार करण्यात अडचणी येणे असणे यामुळे तुमच्या लहान मुलामध्ये न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची समस्या उद्भवू शकते. जर तुमचे मूल मोठे झाल्यावरही नीट संवाद साधू शकत नसेल तर न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते.
समतोल आणि समन्वय साधण्यात अडचण येणे: जर तुमच्या मुलाला संतुलन किंवा समन्वय राखण्यात अडचण येत असेल तर ते न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे लक्षण असू शकते. समतोल आणि समन्वय साधण्यात अडचणी येऊ शकतात किंवा दैनंदिन क्रिया करण्याचा प्रयत्न करताना अडथळा येऊ होतो. जसे की वस्तू उचलणे, खेळणे किंवा धावणे यासारख्या काही हालचाली करण्याच्या मुलाच्या क्षमतेवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
छातीतल्या जळजळीला अॅसिडिटी समजण्याची चूक कदापि करू नका, असू शकतो ‘हा’ कॅन्सर
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.