NIA raid continues; Another ISIS leader arrested, one from Mumbai too
मुंबई – फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या भारतात ‘डी-कंपनी’च्या दहशतवादी कारवायांना मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना हवालामार्फत “मोठी रक्कम” पाठवल्याचा आरोप राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आरोपपत्रातून केला आहे. तसेच प्रतिष्ठीत आणि राजकीय व्यक्तींना लक्ष्य करण्यासाठीही विशेष सेल स्थापन केल्याचा दावाही आरोपपत्रात केला आहे.
दहशतवादी कारवायासाठी वित्तपुरवठा केल्याप्रकरणी एनआयएने नुकतीच आरीफ भाईजान, शब्बीर शेख आणि मोहमम्द सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रुट यांना अटक केली होती. तिघेही दाऊदचा साथीदार आणि कुख्यात गुंड छोटा शलीकचे नातेवाईक आहेत. त्यांच्या अटकेनंतरच एनआयएने केलेल्या चौकशी आणि तपासाच्या आधरावर शनिवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तिघा आरोपींसह दाऊद आणि छोटा शकील यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
दाऊदने पाकिस्तानच्या आयएसआयच्या मदतीने भारतीय लोकांमध्ये भीती निर्माण करून मुंबईसह इतर भागात दहशतवादी हल्ले करण्याशी संबंधित कारवाया करण्यासाठी तसेच राजकीय नेते आणि प्रतिष्ठित व्यावसायिकांसह अन्य व्यक्तींवर हल्ले करून भारतातील लोकांमध्ये दहशत माजवण्यासाठी डी कंपनीने एक विशेष युनिट स्थापन केल्याची माहिती मिळाली असल्याचे एनआयएने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपींनी परदेशात राहणाऱ्या फरार आरोपींकडून हवालामार्फत मोठी रक्कम मिळवल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
२०११ मध्ये आणि त्यानंतरही आरोपी सलीम कुरेशीने शकील आणि दाऊदच्या सांगण्यावरून मुंबईतील सुमारे २.७० कोटी किंमतीचे दोन फ्लॅट पीडितांना धमकावून हडप केल्याचे एनआयएच्या तपासात उघड झाले आहे. तसेच सलीम फ्रूटने दुसऱ्या एका प्रकरणात लोकांना धमकावून ५३.७५ लाख रुपये उकळल्याचेही समोर आले असून अन्य काही प्रकरणातही आरोपी दाऊद आणि शकीलच्या नावाने धमक्या देऊन पैसे उकळत असल्याचे समोर आले आहे.