Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार!

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यातील राजूर या गावी  शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

  • By नारायण परब
Updated On: Dec 07, 2024 | 06:35 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यातील राजूर या गावी  शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवाचे राजूर येथील निवासस्थानी अंत्यदर्शन घेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी पिचड यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. याप्रसंगी आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार किरण लहामटे आदी उपस्थित होते.

काल सायंकाळी माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते, मधुकरराव पिचड यांचे ब्रेनस्ट्रोकमुळे नाशिक येते निधन झाले. दोन महिन्यापासून ते नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.

मारकडवाडीत राहूल गांधी काढणार लाँग मार्च; शरद पवार, उद्धव ठाकरेंही गावकऱ्यांशी साधणार संवाद

एक सुसंस्कृत, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड

त्यांना श्रध्दांजली देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणातील दलित, आदिवासी वंचित समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा त्यांची उन्नती व्हावी यासाठी आणि आदिवासींच्या वन जमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी मधुकरराव कार्यतत्पर होते. राजकारणी म्हणून नव्हे तर एक समाजसुधारक म्हणूनही त्यांनी उत्तम काम केले. निळवंडे धरणाचे 20 किलोमीटरचे काम थांबले होते, तेव्हा पिचड साहेबांच्या माध्यमातून या धरणाचे काम मार्गी लागले. या धरणामुळेच आज 100 किलोमीटर पर्यंतच्या परिसरातील शेतकऱ्यांना पाणी मिळत आहे. या धरणाला थोर स्वातंत्र्य सेनानी राघोजी भांगरे जलाशय असे नाव देण्यात यावे याकरिता त्यांनी आग्रही भूमिका मांडली होती.  ते मितभाषी, व्यासंगी आणि उत्तम वक्ते होते. अनेक विषयांचे ज्ञान, व्यासंग आणि सर्वांशी संपर्क ठेवून होते. महाराष्ट्रातील एक सुसंस्कृत, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या जाण्याने अतिव दुःख झाले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर मधुकरराव पिचड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी सालीमठ यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलीस दलाने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, हेमंत सावरा, राजाभाऊ वाजे, आमदार नरहरी झिरवाळ, सत्यजित तांबे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राजकीय आणि सामाजिक आणि विविध क्षेत्रातील अनेक व्यक्ती यावेळी उपस्थित होत्या.

Abu Azami Leave Mahavikas Aghadi: अबू आझमी महाविकास आघाडीतून बाहेर का पडले? हे आहे खरं कारण

मधुकरराव पिचड यांचा राजकीय प्रवास

मधुकरराव पिचड यांनी स्थानिक निवडणुकीतून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 1980 ते 2014 या कालावधीकरिता अहिल्यानगर येथील अकोले मतदारसंघांचे आमदार होते. या काळात त्यांनी अनेकदा मंत्रिपदाची धुरा सांभाळली. 1995 ते 1999 याकाळात ते विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी नेहमीच संघर्ष केला.

 

Web Title: Former minister madhukarrao pichads body cremated with state honours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2024 | 06:35 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • devendra fadnavis
  • maharashtra

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: अहिल्यानगर तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा! ‘या’ पोहोचतंय टँकरद्वारे पाणी
1

Ahilyanagar News: अहिल्यानगर तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा! ‘या’ पोहोचतंय टँकरद्वारे पाणी

Ahilyanagar News: साकळाई योजनेला वादाचे ग्रहण! घोड धरण लाभक्षेत्रातील शेतकरी उतरले रस्त्यावर
2

Ahilyanagar News: साकळाई योजनेला वादाचे ग्रहण! घोड धरण लाभक्षेत्रातील शेतकरी उतरले रस्त्यावर

Gadchiroli News: गडचिरोली जिल्ह्यात प्राणी प्राधिकरणाचे भिजत घोंगडे! ठोस कारवाई नाही; वनविभागाद्वारे जनजागृतीचा अभाव
3

Gadchiroli News: गडचिरोली जिल्ह्यात प्राणी प्राधिकरणाचे भिजत घोंगडे! ठोस कारवाई नाही; वनविभागाद्वारे जनजागृतीचा अभाव

CET News : दुसऱ्या संधीच्या PCM-PCB नोंदणीला चांगला प्रतिसाद, एका दिवसात १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंद
4

CET News : दुसऱ्या संधीच्या PCM-PCB नोंदणीला चांगला प्रतिसाद, एका दिवसात १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.