शेतात वीज कोसळून 6 महिला जखमी (File Photo : Lightning-strikes)
सिल्लोड : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस होताना दिसत आहे. तर काही ठिकाणी अद्याप पावसाने उघडीप दिल्याचे पाहिला मिळाले. त्यातच सिल्लोड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात वीज पडून तालुक्यातील चार जणांचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यात पाऊस झाल्याचे पाहिला मिळाले. यामुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर एकप्रकारे संकट आल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला. आमदार अब्दुल सत्तार यांनी घडलेल्या घटनेचा तसेच वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या.
तसेच पीडित शेतकऱ्यांनी धीर धरावा, असे अब्दुल समीर यांनी सांगितले. जखमी दोघे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. रंजना बापुराव शिंदे (५०, रा. मोढा बू, ता. सिल्लोड), यश राजू काकडे (१४), रोहित राजू काकडे (२१) (दोघे सख्खे भाऊ रा. मौजे सारोळा), शिवाजी सतीश गव्हाणे (पिंपळदरी ता. सिल्लोड) यामध्ये मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर जीवन सतीश गव्हाणे (रा पिंपळदारी), विशाल ज्ञानेश्वर शिंदे (मौजे खातखेडा) जखमींची नावे आहेत.
कन्नड तालुक्यात तिघे जखमी, बैल ठार
कन्नड शहर व तालुक्यात दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. या पावसात नितीन भीमराव शिंदे (वय २३,, रा. भोकनगाव) शेतात मका लागवड करताना बाजूला वीज पडून त्यांना धक्का बसला. तसेच दुसऱ्या एका घटनेत बैलही ठार झाला.