
बारामती : बारामती येथील श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून चैतन्य मातृत्व योजना २०२२ सुरु करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ लकी जोडप्यांना मोफत आयव्हीएफ उपचार करण्यात येत असल्याची महिती, डॉ आशिष जळक व डॉ प्रियंका जळक यांनी दिली.
श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती गेली सात वर्ष आयव्हीएफच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांच्या आयुष्यात आयव्हीएफच्या माध्यमातून मातृत्व स्वप्नपूर्ती साकारत आहे. टेस्ट ट्यूब बेबी म्हटले की, त्यासाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च आणि आर्थिक बोजाने आर्थिक कंबरडे मोडायची भीती यामुळे लोक टेस्ट बेबीच्या उपचारापासून वंचित राहत होता. ही बाब लक्षात घेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनानुसार श्री चैतन्य मातृत्व योजना २०२२ सुरू केली.
या योजनेअंतर्गत सर्वप्रथम १०१ लकी जोडप्यांचे आयव्हीएफ उपचार मोफत होणार आहेत. या उपक्रमासाठी सुमारे ८० लाख रुपयांचा खर्च बारामतीचे श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर स्वतः रुग्णांसाठी उचलणार आहे. केवळ कमी खर्चात उपचार न देता जागतिक दर्जा सांभाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न देखील श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटरने केला आहे. डॉ. आशिष जळक यांच्या प्रयत्नांतून सुमारे ४००० हून अधिक रुग्णांच्या आयुष्यात गेल्या आठ वर्षात टेस्ट टयूब बेबीच्या माध्यमातून यश आलेले आहे. त्यांचे मातृत्वाचे स्वप्न साकारले आहे. या निमित्ताने बारामतीचे नाव आयव्हीएफच्या बाबतीत जागतिक नकाशावर गेलेले आहे. बारामतीच्या वैद्यकीय क्षेत्राचा नावलौकीकही यामुळे उंचावला आहे.
आर. आय. विटनेस प्रणाली, ब्लास्टोसिस ट्रान्सफर, लेझर हॅचिंग यांसारख्या जागतिक दर्जाच्या आयव्हीएफ मधील सुविधा देणारे पश्चिम महाराष्ट्रातील श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर हे एक अग्रगण्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर ठरले आहे. डॉ. आशिष जळक हे सामान्य परिस्थिती असलेल्या घरातून आल्यामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात पैशामुळे उपचार झाला अशी अडचण त्यांनी कधीच येऊ दिली नाही. यावर्षी देखील आजादी का अमृत महोत्सवानिमित्त ७५ लकी जोडप्यांचा आयव्हीएफ मोफत करण्याचा संकल्प श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने केला आहे.
व्यावसायिकतेपेक्षाही अपत्य प्राप्तीला अधिक महत्व…
वंध्यत्वनिवारण होऊन जेव्हा जोडप्याला अपत्यप्राप्ती होते, त्या वेळेस त्या कुटुंबात निर्माण होणारा आनंद हा सर्वाधिक महत्वाचा वाटतो. लग्नानंतर अपत्यासाठी आसुसलेले दांपत्य जेव्हा चिमुकल्या बाळाला हातात घेतात, तेव्हा त्यांच्या चेह-यावरचे समाधान वेगळा आनंद देणारे असते. श्री चैतन्य टेस्टट्यूब बेबी सेंटरमध्ये या बाबत मोफत मार्गदर्शन शिबीरांचे सातत्याने आयोजन केले जाते. अत्यल्प खर्चात ही प्रक्रीया पार पाडली जाते. दोन चाचण्या अपयशी ठरल्या तर पुढील चाचण्या मोफत केल्या जातात.
[read_also content=”विद्युत रोषणाईने उजळल्या महापालिका इमारतीसह क्षेत्रीय कार्यालयांच्या इमारती https://www.navarashtra.com/maharashtra/area-office-buildings-including-municipal-buildings-lit-by-electric-lighting-nrdm-315644.html”]
वंध्यत्व निवारणासाठी नेमके काय करायला हवे…
या बाबत काही शास्त्रीय तपासण्या कराव्या लागतात. महिला व पुरुषांसाठी त्या स्वतंत्र असतात. कोणी काहीही सांगितले तरी जो पर्यंत अचूक तपासणी होऊन नेमके निदान होत नाही तो वर काहीही सांगणे योग्य नसते. महिलांमध्ये गर्भनलिका तपासणी, हार्मोन्सची तपासणी गरजेची असते तर पुरुषांमध्ये वीर्याची तपासणी करावी लागते. अपत्य प्राप्तीच्या दृष्टीने या तपासण्या गरजेच्या असतात, त्यामुळे मनामध्ये संकोच किंवा भीती न बाळगता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासण्या करुन घ्याव्यात.
टेस्टट्यूब बेबी कोणाला उपयुक्त ठरते.
अनेकदा वाट बघूनही अपत्यप्राप्ती होत नाही. वय वाढून जाते, अशा वेळेस महिलेचे वय जास्त असणे, गर्भनलिका बंद असणे, स्त्री बिजाची पुरेशी वाढ न होणे किंवा स्त्रीबिजाची कमतरताच असणे, गर्भाशयात गाठी असणे, वारंवार गर्भपात होणे अशा समस्यांमुळे महिलांमध्ये नैराश्य येते. मात्र अचूक निदान व तपासणी झाल्यानंतर टेस्ट ट्यूब बेबी हे अशा जोडप्यांसाठी ख-या अर्थाने वरदानच ठरु शकते. नैराश्य झटकून स्त्रियांनी याचा विचार करायला हरकत नाही, असे डॉ आशिष जळक यांनी सांगितले.