Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयापासून आयटी पार्कपर्यंत…; सोलापूरच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीसांचा मास्टरप्लॅन

सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्याचा उल्लेख करत, नाईट लँडिंग सुविधा आणि मुंबईसाठी सोयीस्कर वेळेत उड्डाणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 28, 2026 | 05:33 PM
Devendra Fadnavis Solapur Visit 2026, Solapur IT Park News, Solapur Engineering

Devendra Fadnavis Solapur Visit 2026, Solapur IT Park News, Solapur Engineering

Follow Us
Close
Follow Us:
  • सोलापुरात लवकरच सुरू होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय
  • सोलापूरला ‘वाढवण’ बंदराशी जोडणार
  • सोलापूरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – फडणवीस
Devendra Fadnavis Solapur Visit  : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर जिल्हा दौऱ्यात विविध विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. बार्शी येथील श्री भगवंत प्रकट दिनानिमित्त महापूजा केल्यानंतर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात व कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन केले.

यावेळी सोलापूर जिल्ह्याच्या अध्यात्मिक महत्त्वावर प्रकाश टाकत त्यांनी पंढरपूरला देशभरातून भाविक येत असल्याचे सांगितले. “केवळ पंढरपूर नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणारा विकास करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोलापूरला वाढवण बंदराशी जोडण्याचा प्रकल्प राबवणार असून, लवकरच आयटी पार्क सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. उजनी धरणातील पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याची माहिती देताना, पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचा व्यवसाय दहापट वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीत तुफान स्पर्धा; पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ नावाचीही जोरदार चर्चा

सोलापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, येत्या वर्षभरात ते महाविद्यालय सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे, आयटी क्षेत्राच्या दृष्टीने सोलापूरला चालना देण्यासाठी आयटी पार्क उभारण्याचा निर्णय केवळ घोषणेत न ठेवता त्यासाठी फेब्रुवारीमध्ये जमीनही उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी लवकरच आयटी पार्क सुरू करून स्थानिक तरुणांना याच ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देऊ,” अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.

याशिवाय, सोलापुरात आधुनिक रेडिमेड गारमेंट पार्क उभारण्याची योजनाही त्यांनी जाहीर केली. शहरासाठी पाणीपुरवठा योजना राबवून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. उड्डाणपूल प्रकल्पांबाबत केंद्र स्तरावर अडचणी असल्यास १५ दिवसांत बैठक घेऊन त्या सोडवू, असेही त्यांनी नमूद केले.

सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्याचा उल्लेख करत, नाईट लँडिंग सुविधा आणि मुंबईसाठी सोयीस्कर वेळेत उड्डाणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, नवी मुंबई विमानतळावर ऑपरेटरला आवश्यक स्लॉट उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वतः घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Pune News: ‘भीमा-पाटस’वर अखेर प्रशासकाची नियुक्ती! निवडणूक निधी न भरल्याने ६ वर्षांपासूनचा पेच सुटला

कॉरिडॉरमुळे पंढरपूरचा विकास दहापट

महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देताना, पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाबाबतही त्यांनी भूमिका मांडली. “या प्रकल्पामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचा व्यवसाय दहापट वाढेल. अन्यथा तुम्ही माझं नाव बदला,” असे ठाम विधान त्यांनी केले.

कॉरिडॉरसाठी प्रभावित होणाऱ्या नागरिकांना योग्य मोबदला, पर्यायी दुकाने किंवा विशेष पॅकेज दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी सध्या सुविधा अपुऱ्या असल्याने हा प्रकल्प आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलू

सोलापूरला वाढवण बंदराशी जोडण्याचा प्रकल्प हाती घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले, उजनी धरणातील पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोट ही महाराष्ट्राची अध्यात्मिक शक्ती असल्याचे सांगत या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

 

Web Title: From the government engineering college to the it park devendra fadnaviss masterplan for solapurs development

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 05:33 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • pandharpur
  • Solapur

संबंधित बातम्या

Solapur Crime: ‘पैसे मागितले म्हणून मारला!’ सकाळीच रक्ताचा सडा; मोहोळ तालुक्यातील घटना
1

Solapur Crime: ‘पैसे मागितले म्हणून मारला!’ सकाळीच रक्ताचा सडा; मोहोळ तालुक्यातील घटना

Solapur Crime: धुण्यासाठी गेलेल्या आईसह दोन चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू; सोलापुरातील घटना
2

Solapur Crime: धुण्यासाठी गेलेल्या आईसह दोन चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू; सोलापुरातील घटना

Solapur Crime: विजेचा धक्का की घातपात? विवाहित महिलेचा मृत्यू; शिक्षक पतीवर गुन्हा दाखल
3

Solapur Crime: विजेचा धक्का की घातपात? विवाहित महिलेचा मृत्यू; शिक्षक पतीवर गुन्हा दाखल

मोहोळमध्ये श्री नागनाथ महाराज यात्रेदरम्यान पेहरावावरून वाद; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मिरवणूक शांततेत
4

मोहोळमध्ये श्री नागनाथ महाराज यात्रेदरम्यान पेहरावावरून वाद; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मिरवणूक शांततेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.