पुणे : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंसह (NCP leader Supriya Sule), अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) आणि शरद पवार (NCP chief Sharad Pawar) यांच्यावर खालच्या शब्दात टीका केल्याने त्यावर आता राष्ट्रवादी गट आक्रमक झाल्याने पडळकरांना आता इशारा देण्यात आला आहे.
जहरी टीका
दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळेंना लबाड लांडग्याची लेक म्हटले, तर अजित पवार यांना लबाड लांडग्याचे लबा़ड पिल्लू आहे. त्यामुळे आम्ही त्यांना मानत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना कोणतेही पत्र दिले नाही.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे जिथं दिसतील त्या ठिकाणी त्यांना चोप देणार, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका करताना त्यांना लांडग्याचं पिल्लू असं म्हटलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पडळकरांविरोधात ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत.
भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या वक्तव्याचे पडसाद पुण्याच्या मावळमध्ये उमटले आहेत. अजित पवारांचे समर्थक थेट जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर उतरले. सोमटने फाटा येथे त्यांनी पडळकरांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं. वेळोवेळी विनाकारण अजित पवारांवर भाष्य करणाऱ्या पडळकरांना पुणे जिल्ह्यात फिरू देणार नाही, आता पडळकरांनी माफी मागितली तरी दिली जाणार नाही, ते दिसतील तिथं त्यांना आम्ही चोप देऊ अशी आक्रमक भूमिका अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली आहे. यानिमित्ताने महायुतीत संघर्ष निर्माण झाल्याचं ही पाहायला मिळालं.