Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News : गोवंश संरक्षणासाठी सरकारचे कठोर पाऊल! जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; अवैध कत्तलखान्यांवर कारवाईचे निर्देश

राज्यात गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध कत्तल आणि अनधिकृत कत्तलखान्यांवर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोर पावले उचलली आहेत. गृह विभागाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी दिले आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 28, 2026 | 09:12 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

Buldhana News : राज्यात गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध कत्तल आणि अनधिकृत कत्तलखान्यांवर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोर पावले उचलली आहेत. गृह विभागाने यासंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी दिले आहेत. शासनाने महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच प्राण्यांना निर्दयपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे.

भाजपचा ‘शिंदे पॅटर्न’ सोलापुरात? विधानपरिषदेसाठी महिला चेहऱ्याला संधीची जोरदार चर्चा; अंतिम क्षणापर्यंत उमेदवारीवर सस्पेन्स कायम

महानगरपालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषदांना त्यांच्या हद्दीतील अनधिकृत कत्तलखाने शोधून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संघटित पद्धतीने गोतस्करी करणाऱ्या टोळ्यांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस विभागाला देण्यात आले आहेत. तसेच परिवहन विभागाला गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये संयुक्त तपासणी चौक्या स्थापन करण्यात येणार असून पोलिस, परिवहन विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे संयुक्त पथक वाहनांची तपासणी करणार आहे.

राज्यभर संयुक्त भरारी पथकेही कार्यरत राहणार असून अवैध गोवंश वाहतूक आणि बेकायदेशीर कत्तलखान्यांवर विशेष मोहीम राबवली जाणार आहे. डायल ११२ हेल्पलाईनवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याशिवाय प्रत्येक पोलिस अधीक्षक कार्यालय आणि परिवहन विभागात स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करून त्यांचे संपर्क क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात धार्मिक कारणांसाठी तात्पुरत्या पशुवधगृहांना परवानगी देण्यात आल्यास स्वच्छता, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य नियमांचे पालन बंधनकारक राहणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. पोलिस आयुक्तालय क्षेत्राबाहेरील अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे, तर आयुक्तालय क्षेत्रातील जबाबदारी संबंधित पोलिस आयुक्तांकडे सोपवण्यात आली आहे.

Nurses Protest: नर्सेसच्या बदल्यांवरून वाद; ‘हा फक्त नियमांचा नव्हे तर मानवी… ’; बदल्यांवर अधिकाऱ्यांचे मत

शासनाच्या या निर्णयामुळे राज्यात अवैध गोवंश वाहतूक आणि बेकायदेशीर कत्तलखान्यांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Government takes strict action for cattle protection district collector provides details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 09:12 PM

Topics:  

  • buldhana news
  • cow news

संबंधित बातम्या

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
1

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

Buldhana News: ‘पेनगंगा’ च्या गाळप हंगाम पूर्वतयारीचा आरंभ; बुलढाणा अर्बन पेनगंगा साखर कारखान्याच्या पाठीशी – चांडक
2

Buldhana News: ‘पेनगंगा’ च्या गाळप हंगाम पूर्वतयारीचा आरंभ; बुलढाणा अर्बन पेनगंगा साखर कारखान्याच्या पाठीशी – चांडक

धडक कारवाई; दुसरबीड, बीबी, सुलतानपूरमधील अतिक्रमिकांना प्राथमिक नोटीस, महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा
3

धडक कारवाई; दुसरबीड, बीबी, सुलतानपूरमधील अतिक्रमिकांना प्राथमिक नोटीस, महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा

Buldhana News: भूखंड घशात घालण्याचा भूमाफियांचा प्रयत्न सुरू; तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन
4

Buldhana News: भूखंड घशात घालण्याचा भूमाफियांचा प्रयत्न सुरू; तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.