Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal News: शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग वाढली! कृषी विभागाकडून सतर्कतेचा इशारा, पेरणीची घाई करू नये

निसर्गाचे आणि मृग नक्षत्राचे पाणी जोपर्यंत पेरणीसाठी पडत नाही, तोपर्यंत शेतकरी पेरणी करणार नाही, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.पाऊस येण्याचे चिन्हे दिसताच आणि आकाशात आभाळ पाहून शेतकरीराजा सुखावल्याचे पाहावयास मिळत आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 09, 2026 | 03:30 PM
शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग वाढली! कृषी विभागाकडून सतर्कतेचा इशारा, पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग वाढली! कृषी विभागाकडून सतर्कतेचा इशारा, पेरणीची घाई करू नये

Follow Us
Follow Us:

मृगनक्षत्र लागताच महागाव तालुक्यासह शेंबाळपिंपरी परिसरात शेतकऱ्यांमध्ये खरीप पेरणीची लगबग दिसून येत आहे पाऊस येण्याचे चिन्हे दिसताच आणि आकाशात आभाळ पाहून शेतकरीराजा सुखावल्याचे पाहावयास मिळत आहे. यापूर्वीच परिसरात शेतीतील नांगरणी वखरणी झाली आहे. जमीन प्रखर उन्हात तापून गर्भातील नांगरणीमुळे ढेकळ मुरून सुपीक मातीत रूपांतर झाले आहे. निसर्गाचे आणि मृग नक्षत्राचे पाणी जोपर्यंत पेरणीसाठी पडत नाही, तोपर्यंत शेतकरी पेरणी करणार नाही, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.(फोटो सौजन्य – AI)

रखरखत्या उन्हातही शेती मशागतीची कामे! मान्सूनची चाहूल; संकटांचा सामना करत बळीराजाने कंबर कसली

खरे तर जमिनीतील माती परीक्षण, मातीचे गुणधर्म, जलसंधारण क्षमता, घनता, आकार, ओलाव्याचे प्रमाण, रासायनिक गुणधर्मात क्षारता, स्फुरद आणी कॅल्शियम मॅग्नेशियम व लोह यांचे प्रमाण तपासून बियाणे व खते वापराबाबत कृषी विभागाकडून एक महिन्यापूर्वीच सल्ला मिळायला पाहिजे होते. परंतु कृषी विभागाला उशिरा शहाणपणा सुचले. सध्या कृषी विभागाकडून अशा शिबिरांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात आहे.

शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शनाची गरज

विशेष म्हणजे, तालुका कृषी विभागाचे शेंबाळपिंपरी कृषी मंडळाकडे कायमच दुर्लक्ष राहिलेले आहे. शेंबाळपिंपरी कृषी मंडळाकडे शेंबाळपिंपरी कृषी मंडळाधिकारी फिरकत नाही. ठवड्यातून काही दिवस कृषी सहाय्यक आपली हजेरी ग्रामपंचायतमध्ये लावतात. काही शेतकऱ्यांना भेटतात आणि जातात. तालुका कृषी अधिकारी मुकाडे यांनी शेंबाळपिंपरी कृषी मंडळाकडे लक्ष देऊन कृषी मंडळ अधिकारी यांना शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी समज द्यावी, अशी शेंबाळपिंपरी कृषी मंडळातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

Yavatmal News: एटीएमवर ना गार्ड, ना सीसीटीव्ही! सुरक्षेची जबाबदारी बँकांवर; अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकच नाही

कृषी सहाय्यांकडून पेरणी आणि मशागतीसाठी मार्गदर्शन:

कृषी विभागाकडून प्रत्येक मंडळात कृषी सहाय्यक यांच्याकडून पेरणी आणि मशागतीसाठी मार्गदर्शन होत आहेत. शुक्रवारी बाळपिंपरी कृषी मंडळाचे कृषी सहाय्यक मनोज कांबळे यांनी परिसरातील शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मार्गदर्शन केले. यावेळी कांबळे म्हणाले की, पुरेशा पावसाअभावी शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. सरी वरंबा पद्धतीनेच पेरणी करावी. बी-बियाण्याबाबतसुद्धा मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, सोयाबीन बियाणे नाजूक असल्यामुळे त्याची काळजी घेतली पाहिजे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Grown almost for farmers to sow alert warning from agriculture department dont rush sowing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Agricultural Crops
  • Farmer Issue
  • Monsoon 2026

संबंधित बातम्या

Wardha : पावसाची सर्वदूर संततधार ! आणखी २ दिवस बरसणार; शुक्रवारीही ‘यलो अलर्ट’चा इशारा
1

Wardha : पावसाची सर्वदूर संततधार ! आणखी २ दिवस बरसणार; शुक्रवारीही ‘यलो अलर्ट’चा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.