सातारा : खासदार संभाजीराजे छत्रपती ( MP Sambhajiraje Chhatrapati ) व सातारचे खासदार उदयनराजे भोसले ( MP Udayanraje Bhosale ) यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. गुरुवारी सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती व सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तेढ निर्माण होईल, असे ते वक्तव्य असल्याने गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात सातारा पोलिसांत आॉक्टोबर २०२० मध्ये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सातारा पोलिसांनी अॅड. सदावर्ते यांना ताब्यात घेतले आहे. आज त्यांना पोलिस ठाण्यात हजर केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. तूर्तास न्यायालाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी दिली असून या प्रकरणाबाबत आता सविस्तर तपास सातारा पोलीस करणार आहे.
[read_also content=”अवकाळी पावसाचा मांडेगावातील शेतकऱ्यांना फटका, दीड एकर द्राक्षबाग भुईसपाट https://www.navarashtra.com/maharashtra/untimely-rains-hit-farmers-in-mandegaon-one-and-half-acres-of-grapes-farm-damage-nrps-269168.html”]
[read_also content=”गव्हाच्या सरकारी खरेदीचे निकष शिथिल करा; पंजाब सरकारची केंद्र सरकारकडे मागणी https://www.navarashtra.com/india/relax-government-procurement-criteria-for-wheat-demand-of-punjab-government-to-central-government-nrdm-269114.html”]