Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळजी घ्या ! राज्यातील अनेक भागांत उष्णतेचा बसतोय तडाखा; 2.50 लाखांपेक्षा अधिक उष्माघाताचे रुग्ण

जळगाव, नाशिक, पालघर आणि रायगड येथे उष्माघाताचे रुग्ण आढळले आहेत. मृत्यूची नोंद नसली तरी या घटना पुढील धोक्याचा इशारा मानल्या जात आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 31, 2026 | 08:03 AM
उष्माघाताचा धोका वाढतोय; एकाच दिवशी 10 जणांचा मृत्यू, रेल्वेतच पाच जण दगावले

उष्माघाताचा धोका वाढतोय; एकाच दिवशी 10 जणांचा मृत्यू, रेल्वेतच पाच जण दगावले

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात मार्चअखेरीस उन्हाचा तडाखा तीव्र होत असल्याचे चित्र समोर आले आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, मार्चमध्ये २.५ लाखांहून अधिक रुग्णांनी शासकीय यंत्रणेत उपचार घेतल्याची नोंद झाली आहे. उष्णतेशी संबंधित तक्रारी वाढत असताना उष्माघाताच्या घटनांचीही सुरुवात झाली आहे.

अहवालानुसार, राज्यभरात एकूण २५०८३२ रुग्ण नोंदवले गेले. यामध्ये प्रौढ रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक (२.२८ लाख) असून, बालरुग्णांची संख्या २२ हजारांपेक्षा अधिक आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकट्याच ५१ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल ठाणे (४५ हजार), पालघर (३३ हजार), पुणे (२३ हजार) आणि नागपूर (२२ हजार) या जिल्ह्यांतही मोठी संख्या दिसून आली. यावरून शहरी भागात उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र असल्याचे स्पष्ट होते.

हेदेखील वाचा : Mumbai Heatwave Alert: मुंबईत उष्णतेचा कडेलोट! 24 तासात अलर्ट बदलला, कुठे किती तापमान? वाचा सविस्तर बातमी

२४ मार्चपर्यंतच्या अहवालानुसार, राज्यात उष्माघाताच्या किमान पाच घटना नोंदवण्यात आल्या आहेत. जळगाव, नाशिक, पालघर आणि रायगड येथे उष्माघाताचे रुग्ण आढळले आहेत. मृत्यूची नोंद नसली तरी या घटना पुढील धोक्याचा इशारा मानल्या जात आहेत. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळीही आर्द्रतेचे प्रमाण 85 टक्के

अनेक जिल्ह्यांत कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. काही ठिकाणी किमान तापमान २५ अंशांच्या पुढे गेले असून, सकाळीही आर्द्रतेचे प्रमाण ८५ ते १०० टक्क्यांदरम्यान आहे. उष्णता आणि आर्द्रतेचा दुहेरी परिणाम शरीरावर ताण वाढवत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर आणि नंदुरबार या जिल्ह्यांतही रुग्णसंख्या वाढत आहे.

रत्नागिरीत उन्हाची तीव्रता अधिक

रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या तापमानामुळेउष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे, हे लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य विभाग सतर्क झाला असून, जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांना उष्माघात प्रतिबंध व उपचारासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Heatwave batters several parts of maharashtra over 2 50 lakhs heatstroke cases reported

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 08:01 AM

Topics:  

  • Climate Change
  • Heat Waves
  • Weather Update

संबंधित बातम्या

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
1

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…
2

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट
3

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण
4

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.