इचलकरंजीत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक (फोटो- टीम नवराष्ट्र)
कोल्हापूर रोडवरील सोन्यामारुती मंदिराच्या पिछाडीस औद्योगिक वसाहतीतील एका खाजगी इमारतीत प्रार्थनास्थळ सुरु असून त्याचा भागातील नागरीकांना त्रास होत असल्याबद्दल नागरिकांनी हिंदुत्ववाद्यांकडे तक्रार दिली होती. त्याची शहानिशा करुन माहिती घेण्यासाठी काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते पोलिसांना सोबत घेऊन रविवारी तेथे गेले. त्यावेळी त्याठिकाणी धर्मांतरणाचा प्रकार निदर्शनास आला होता. यावेळी तेथील लोकांशी शाब्दीक वाद घातल्याप्रकरणी प्रार्थनास्थळाशी संबंधितांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत सोमवारी पोलीस ठाण्याच्या आवारातच सामुहिक प्रार्थना केली होती. त्यानंतर पोलिसांनी बिशप संजय शामसुंदर आढाव यांच्या तक्रारीवरुन शिवजी व्यास यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल केला.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर संतप्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येत पोलीस उपअधिक्षक समिरसिंह साळवे यांना त्याचा जाब विचारला. त्यावेळी साळवे यांनी दिलेल्या उत्तरावर समाधान न झाल्याने कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात वादग्रस्त प्रार्थनास्थळाशी संबंधितांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय आम्ही हटणार नाही, असा पवित्रा घेतला.
इचलकरंजीत पूर्ववैमनस्यातून दोन गटांत राडा; तीनजण गंभीर, 18 जणांना अटक
गजानन महाजन (गुरुजी) यांनी संतप्त भावना व्यक्त करत दुपारी दोन वाजेपर्यंत गुन्हे दाखल न झाल्यास आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला. त्यानंतर बराचवेळ पोलिसांकडून काहीच उत्तर न आल्याने हिंदुत्ववाद्यांनी शिवतिर्थ परिसरात जाऊन ठिय्या मारुन बसण्याची भूमिका घेतली. त्यावर उपअधिक्षक साळवे यांनी चर्चेची तयारी दर्शवत त्वरीत गुन्हे दाखल करण्याचे मान्य केले. अन् गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केली. यावेळी महाजन गुरुजी यांनी केवळ गुन्हे दाखल करुन चालणार नाही तर बेकादेशीर कृत्य करणार्यांना कडक शासन करा आणि निरापराध कार्यकर्त्यांवर झालेले गुन्हे त्वरीत पाठीमागे घेण्याची कार्यवाही करण्याची मागणी केली.
दोन तास चाललेल्या या प्रकारामुळे पोलीस ठाणे आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाण्याच्या आवारात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जमावबंदी आदेशाचा भंग