Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaysingrao Pawar Passes Away : मराठी इतिहासविश्वावर शोककळा; जयसिंगराव पवार काळाच्या पडद्याआड

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांची ओळख होती. आज त्यांनी कोल्हापूरमध्ये वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 26, 2026 | 02:35 PM
Historian and Author Jaisingrao Pawar Passes Away marathi news

Historian and Author Jaisingrao Pawar Passes Away marathi news

Follow Us
Close
Follow Us:
  • इतिहासकार जयसिंगराव पवार यांचे निधन
  • त्यांच्या जाण्याने इतिहास आणि साहित्यिक क्षेत्रात शोककळा
  • इतिहासाचा दाखला देत भविष्याची सांगड
 

Jaysingrao Pawar Passes Away : कोल्हापूर : जेष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना आज (दि.26) देवाज्ञा झाली. आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. (Kolhapur News) जयसिंगराव पवार यांनी इतिहासाच्या साक्षीने भविष्याची सांगड घातली. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे समाजामध्ये एक पोकळी निर्माण झाली.

मागील काही दिवसांपासून डॉ जयसिंगराव पवार यांची प्रकृती अस्वस्थ होती. फुफ्फुसाच्या संसर्गामुळ जवळपास दीड महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरु होते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठेशाहीचा इतिहासकार हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. यामुळे इतिहास अभ्यासक, विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले.

हे देखील वाचा : सुनेत्रा पवारांचा ‘लेटरबॉम्ब’! अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत वर्चस्वाचा नवा संघर्ष

जयसिंगराव पवार हे महाराष्ट्रातील नामांकित इतिहासकार, लेखक आणि अभ्यासक म्हणून ओळखले जातात. मराठा इतिहास, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर परिश्रम घेतले. त्यांच्या लेखनात ऐतिहासिक सत्य, संशोधन आणि तर्कशुद्ध मांडणी यांचा उत्कृष्ट संगम दिसून येतो.

जयसिंगराव पवार यांनी मराठा साम्राज्य, शिवकालीन घटना आणि विविध ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांवर अनेक पुस्तके लिहिली. त्यांनी केवळ इतिहास सांगितला नाही, तर त्यामागील वास्तव आणि संदर्भही स्पष्ट केले. त्यांच्या संशोधनामुळे इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी वाचकांना मिळाली. ते व्याख्यानांद्वारे आणि लेखनाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड निर्माण करत होते. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि निर्भीड मतांमुळे ते नेहमी चर्चेत राहिले.

हे देखील वाचा : नरहरी झिरवाळ आणि मुख्यमंत्र्यांची गुप्त भेट; वादग्रस्त ‘चित्रफीत’ प्रकरणाने राष्ट्रवादीत खळबळ

जयसिंगराव पवार यांचे कार्य मराठी इतिहास लेखनात महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनामुळे मराठा इतिहास अधिक सखोलपणे समजून घेण्यास मदत झाली. जयसिंगराव पवार यांनी महाराणी ताराबाई, क्रांतिसिंह नाना पाटील, सेनापती संताजी घोरपडे, संभाजी स्मारक ग्रंथ, मराठेशाहीचा मागोवा, मराठी साम्राज्याचा उदयास्त, शिवचरित्र- एक मागोवा, शिवचरित्रापासून काय शिकावे? आणि आमच्या इतिहासाचा शोध व बोध अशी पुस्तके लिहिली आहेत.

Web Title: Historian and author jaisingrao pawar passes away marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • History
  • kolhapur news

संबंधित बातम्या

Indian History: जुन्या काळात राजे-महाराजे सोन्या-चांदीच्या भांड्यांमध्येच जेवण का करायचे? जाणून घ्या यामागचं रहस्य!
1

Indian History: जुन्या काळात राजे-महाराजे सोन्या-चांदीच्या भांड्यांमध्येच जेवण का करायचे? जाणून घ्या यामागचं रहस्य!

Decline of Mughal Empire: ३०० वर्षे राज्य करणारे मुघल साम्राज्य अचानक कसे पत्त्यासारखे कोसळले?जाणून घ्या एका क्लिकवर..
2

Decline of Mughal Empire: ३०० वर्षे राज्य करणारे मुघल साम्राज्य अचानक कसे पत्त्यासारखे कोसळले?जाणून घ्या एका क्लिकवर..

Kolhapur News : पेट्रोल-डिझेल 3 रुपयांनी महागलं,कोल्हापुरात इंधन दरवाढीचा भडका!
3

Kolhapur News : पेट्रोल-डिझेल 3 रुपयांनी महागलं,कोल्हापुरात इंधन दरवाढीचा भडका!

Raja Shivaji Movie : बस काही पाऊले आणखीन! सैराटचा Record तुटणार का? 14 दिवसांचे Box Office Collection
4

Raja Shivaji Movie : बस काही पाऊले आणखीन! सैराटचा Record तुटणार का? 14 दिवसांचे Box Office Collection

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.