राज्यपालनियुक्त 12 आमदारांपैकी 7 आमदारांनी घेतली शपथ (फोटो सौजन्य-X)
बहुप्रतिक्षित 12 राज्यपालनियुक्त आमदारांपैकी सात आमदारांचा शपथविधी सोहळा अखेर संपन्न झाला. या शपथविधी सोहळ्यात भाजपाकडून तीन, तर शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीला दोन दोन जागा मिळाल्या आहेत. 12 पैकी 7 आमदारांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांकडे करण्यात आली आहे. सामाजिक, कला या क्षेत्रात काम करणाऱ्यांना या 12 जागी संधी मिळावी अशी धारणा असतानाही निवडणुकांच्या तोंडावर राजकीय नेत्यांच्या नियुक्त्या याजागी करण्यात आल्या आहेत.
1. चित्रा वाघ
2. विक्रांत पाटील
3. धर्मगुरु बाबूसिंग महाराज राठोड
4. पंकज भुजबळ
5. इद्रीस नायकवाडी
6. हेमंत पाटील
7. मनीषा कायंदे
1 भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांना संधी देण्यात आली असून महिलांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणाऱ्या नेता म्हणून त्यांची ओळख आहे.
2. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि पनवेलचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांना संधी मिळाली असून कोकणात भाजपाचं बळ वाढवण्याची रणनीती यामागे दिसते.
3. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीच्या गादीचे गुरु बाबुसिंग महाराज राठोड यांना भाजपनं आमदारकी दिली. तसेच बंजारा समाजाच्या निवडणुकीतील फायदा आणि विदर्भात त्यांची ताकद वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका ठरणार आहे.
4. छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांना अजित पवारांकडून संधी देण्यात आली. नांदगावमधून दोन वेळा विधानसभेवर गेले आहेत. या निमितानं नांदगाव मतदारसंघातून महायुतीत सुरू झालेला वाद पूर्ण होण्याची चिन्हं आहेत.
5. सांगलीचे माजी नगराध्यक्ष इदेरिस नायकवडी यांना अजित पवारांनी संधा दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मुस्लिम चेहरा असे समीकरण तयार झाले आहे.
6. शिंदे शिवसेनेकडून हिॅगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांना संधी मिळाली आहे. पाटील यांचे तिकीट लोकसभेला कापण्यात आले होते. पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळमधून लढवण्यात आलं होतं. मात्र त्यांचा पराभव झाला होता.
7.मुंबईचा विचार करता मनिषा कायंदे यांना संधी देण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून कायंदे या शिंदे सेनेत आल्या आणि प्रवक्त्या म्हणून कार्यरत आहेत. ठाकरेंच्या सेनेविरोधात कायंदेंना बळ देण्यात आल्याचं मानण्यात येत आहे.






