Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IAS Tukaram Munde News: ‘प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा?’; तुकाराम मुंढेंनी अखेर मौन सोडलं

नागपूर महापालिकेत अनेक वर्षांपासून बेकायदेशीररित्या नोकरी करणाऱ्या १७ कर्मचाऱ्यांच्या २००१ पासून प्रलंबित असलेल्या वेतनाच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी एका नेत्याने माझ्यावर दबाव टाकला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 15, 2025 | 11:15 AM
IAS Tukaram Munde News:

IAS Tukaram Munde News:

Follow Us
Close
Follow Us:
  • भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचे तुकाराम मुंढेंवर आरोप
  • एका प्रमाणिक अधिकाऱ्याला कितील त्रास द्यायचा- तुकाराम मुंढेंचा सवाल
  • खोटे आरोप करून माझ्या मागे चौकश्या लावण्यात आल्या
 

IAS Tukaram Munde News: भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर गंभीर आरोप करत थेट विधीमंडळात त्यांच्या निलंबनाच्या कारवाईची मागणी केली होती. याच दरम्यान त्यांना अनेकदा धमकीचे फोनही करण्यात आल्याचा आरोप खोपडे यांनी केला. या सगळ्या घडामोडींवर अखेर तुकाराम मुंढे यांनी मौन सोडले आहे. ‘एका प्रमाणिक अधिकाऱ्याला कितील त्रास द्यायचा,’ असा सवाल तुकाराम मुंढे यांनी केला आहे.

अमृत म्हणून प्यायले जाणारे लिंबू सरबत ‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक, आरोग्यासंबंधित वाढती

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तुकाराम मुंढे यांनी त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या कारवायांवर भाष्य केलं आहे. “एका प्रमाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा. मी नागपुरात असताना काही लोकांना मनमानी कारभार होऊ दिला नाही. तेव्हापासूनच माझ्या विरोधात कटकारस्थाने रचून मला त्रास दिला जाताहे. जे खोटे आरोप लावण्यात आले, त्यांची चौकशी झाली. पण तिथेही मला क्लिनचीट मिळाली. तरीही वारंवार तेच आरोप करून मला मानसिक त्रास दिला जात आहे. ही एका प्रमाणिक अधिकाऱ्याची हर्रासमेंट आहे.” असं तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

“मी नागपूरमध्ये कार्यरत असताना माझ्या कार्यकाळात अनेकांनी मला काम करू दिले नाहीत. माझ्या कामांमध्ये अडथळे आणण्यात आले. खोटे आरोप करून माझ्या मागे चौकश्या लावण्यात आल्या. तरी माझ्यावर वांरवार तेच आरोप कऱण्यात आले. मी झुकलो नाही, म्हणून माझ्या विरोधात महिलांना समोर करून खोटे आरोप लावले. ‘ असा आरोपही यावेळी तुकाराम मुंढे यांनी केला.

कोबीची भाजी खायला आवडत नाही? मग सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत कोबी पराठा, नोट करा

Tukaram Mundhe : महापालिकेत बेकायदेशीररित्या काम करणाऱ्यांना बडतर्फ

नागपूर महापालिकेत अनेक वर्षांपासून बेकायदेशीररित्या नोकरी करणाऱ्या १७ कर्मचाऱ्यांच्या २००१ पासून प्रलंबित असलेल्या वेतनाच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी एका नेत्याने माझ्यावर दबाव टाकला. पण मला हे प्रकरण संशयास्पद वाटल्यामुळे संपूर्ण प्रकरणाची विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. शासनाच्या नियमाप्रमाणे बेकायदेशीररित्या काम करणाऱ्या सर्व १७ जणांना नोकरीतून बडतर्फ केले. बडतर्फ केलेल्या १७ जणांपैकी एक जण एका स्थानिक आमदाराच्या जवळचा नातेवाईक आहे. त्यामुळे त्या आमदाराने माझ्या विरोधात मोहिम उघडली. ज्या प्रकरणात मला आधीच क्लिनचीट मिळाली आहे. तेच आरोप माझ्यावर पुन्हा पुन्हा केले जात आहेत.’ असंही तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

Vande Mataram : एका पालखीचा ‘विलंब’ आणि झाला राष्ट्रगीताचा जन्म; बंकिमचंद्रांनी ‘अशी’ रचली राष्ट्रभक्तीची

तुकाराम मुंढेंना दिलेली क्लीन चीट रेकॉर्डवर आहे : विजय वडेट्टीवार

तुकाराम मुंढे यांच्या या प्रतिक्रीयांवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील भाष्य केलं आहे. ” तुकाराम मुढे हे प्रामाणिक आहेत की नाहीत, ते इमानदार आहेत की नाहीत. नागपूर महापालिकेत काम करत असताना आयुक्तांनी तुकाराम मुंढेंना क्लिनचीट दिली आहे. त्यावेळी महिला आयोगाकडेही तक्रार करण्यात आली होती. पण ज्या महिलेने तक्रार केली होती. तिलाच आयोगाने दंड ठोठावला, हेही पाहून घ्या. केंद्रीय महिला आयोदानेही क्लीनचीट दिली आहे. त्यामुळे तुकारम मुंढए यांच्यावर जे आरोप केले जात आहेत. ते कोणाच्या स्वार्थासाठी केले गेले. त्याचीही मुख्यंत्र्यांनी सखोल चौकशी करावी. सत्य परिस्थिती तपासून ज्याची चूक असेल त्याच्यावर कारवाई करावी. पण जर मुंढे निर्दोष असतील तर कुठल्याही दबावाखाली कारवाई होऊ नये.”

 

 

Web Title: How much harassment for an honest officer ias tukaram munde breaks silence amid allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 11:15 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Nagpur News
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: पिंपरी-चिंचवडमध्ये तिरंगी लढत; भाजप-राष्ट्रवादी अन्…; कोण जिंकणार?
1

Maharashtra Politics: पिंपरी-चिंचवडमध्ये तिरंगी लढत; भाजप-राष्ट्रवादी अन्…; कोण जिंकणार?

“पुण्याच्या विकासाचा नवा…”; निवडणुकीआधी Devendra Fadnavis यांनी दिली ३ हजार कोटींची भेट
2

“पुण्याच्या विकासाचा नवा…”; निवडणुकीआधी Devendra Fadnavis यांनी दिली ३ हजार कोटींची भेट

Ahilyanagar : अहिल्यानगर शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा ब्राँझ पुतळा साकारला
3

Ahilyanagar : अहिल्यानगर शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा ब्राँझ पुतळा साकारला

Nashik Corporation Elections : उत्तर महाराष्ट्रात महायुती म्हणूनच लढणार- गिरीश महाजन
4

Nashik Corporation Elections : उत्तर महाराष्ट्रात महायुती म्हणूनच लढणार- गिरीश महाजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.