अकोला, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. खारे पाणी प्यायले तर किडनी फेल होते, हे सर्वांना माहिती आहे. राज्यभरात अनेक नागरिक किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. अकोल्यात असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. अकोल्यातील बाळापूर मतदारसंघात अंतर्गत ६० पेक्षा अधिक गावात खारे पाणी प्यायल्यामुळे अनेकांना किडनीचे आजार झाले आहेत. इतकेच नाही तर अनेकांच्या किडनी फेल झाल्या आहेत. एक नव्हे तर दोन्ही किडनी फेल झाल्या आहेत. तब्बल शेकडो जणांना खारे पाणी प्यायलाने किडनीच्या संबंधितआजार झाले आहेत.
जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या सावरपाटी गावातील नागरिकांमध्ये सध्या किडनीच्या आजारामुळे भीतीचे वातावरण आहे. विहिरी आणि बोअरमधील क्षारयुक्त पाणी इथले गावकरी पित आहेत. यामुळे किडनी स्टोन आणि किडनी संबंधीचे आजार गावाकऱ्यांना होत आहेत.
Anjali Damania:बीडमधल्या शेतकरी महिलांची तक्रार; अंजली दमानिया कुणाची फाईल उघडणार
बाळापूर तालुक्यातल्या जवळपास ६० पेक्षा अधिक गावांत हिच परिस्थिती आहे. पारस ते निंबा फाटापर्यंत असलेल्या सर्व गावी हे खारपणपट्ट्यात वळतायेत. दुसरीकडे घरोघरी नळ असले तरी पाण्याच्या टाकीत चढणारे पाणी हे गावातील विहिरी आणि बोअरवेलमधीलच आहे. येथे पूर्णतः क्षारयुक्त पाणी असल्याने अनेकांना विविध आजाराला समोरे जावे लागते आहे. याच्या बचावासाठी गावकरी १५ ते २० किमी अंतराराहून गोड पाणी दुचाकीवर पिण्यासाठी आणत आहेत.
सावरपाटी येथील रहिवासी प्रशांत काळे यांच्या दोन्ही किडन्या पूर्णपणे निकामी झाल्या आहेत. त्यांच्या उपचारांसाठी १२ लाखांहून अधिक खर्च आला असून, हा खर्च भागवण्यासाठी त्यांनी आपली शेती विकली. तरीदेखील आवश्यक निधी जमा होऊ शकलेला नाही. गावातील इतर अनेक नागरिकही अशाच आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. प्रशासनाने या समस्येकडे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, अशी गावकऱ्यांची तीव्र नाराजी आहे.
या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) गाढवे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, “मी या प्रकरणाची माहिती घेऊन तपासणी करतो. त्यानंतरच अधिकृत प्रतिक्रिया देईन.” मात्र, त्यांच्या या भूमिकेमुळे गावकऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. एकूणच, बाळापूर तालुक्यातील सावरपाटी आणि परिसरातील गावांमध्ये खारट पाणी मोठ्या आरोग्य समस्येचे कारण ठरत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून या गावांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. अन्यथा, भविष्यात आरोग्याच्या गंभीर संकटाचा सामना करावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
भविष्य पाहण्याआधी चिमुकले होतायेत युद्धात ठार! हृदय पिळवटून टाकणारा गाझातील मुलांच्या मृत्यूचा अहवाल
निर्जलीकरण (Dehydration): खाऱ्या पाण्यात लवण (सोडियम) अधिक असतो, ज्यामुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सची पातळी बिघडू शकते. परिणामी शरीरात पाणी कमी होऊन निर्जलीकरण होऊ शकते.
हृदयाशी संबंधित समस्या: खाऱ्या पाण्यामुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त दबाव पडतो. यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार, आणि स्ट्रोकसारख्या समस्यांचा धोका वाढतो.
वृद्धी व विकासावर परिणाम: लहान मुलांसाठी खारं पाणी पिणे खूप धोकादायक ठरू शकते. यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
किडनीचे नुकसान: खारं पाणी सतत प्यायल्याने किडनीवर अतिरिक्त ताण येतो. किडनीच्या कार्यावर परिणाम होऊन ती निकामी होऊ शकते. त्यामुळे किडनीच्या विकारांचा धोका वाढतो.
पचनसंस्थेचे विकार: खाऱ्या पाण्याचा दीर्घकालीन वापर पचनसंस्थेवर देखील वाईट परिणाम करू शकतो. पचनाशी संबंधित विकार, गॅस्ट्राइटिस आणि पेप्टिक अल्सर सारखे विकार होऊ शकतात