Photo Credit- Social Media Maharashtra Politics : छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच अंजली दमानिया आक्रमक
मुंबई : बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील आणखी एक प्रकरण उजेडात आणले आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यासोबत राहणाऱ्या राजेंद्र पोपटलाल घनवट नावाच्या व्यक्तीवर दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत. राजेंद्र घनवटने बीडमधील शेतकऱ्यांना धमकावून, त्यांच्या छळ करून, गुन्हे दाखल करून त्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. या आरोपामुळे बीडमधील गुन्हेगारीचं जाळं कुठवर पसरले आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे.
अंजली दमानिया यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत बीडमधील या प्रकरणाचा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत काही पीडित महिलाही होत्या. यावेळी बोलताना दमानिया म्हणाल्या की, ‘काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे ज्यांच्या फोन आला ते तेजस ठक्कर आणि राजेंद्र घनवट नावाचे व्यक्ती होते. तेव्हा ते माझ्याकडे एक फाईल घेऊन आले होते. त्यावेळी मी कोणाच्याही फाईलवरून असं काम करत नाही म्हणून मी पंकजा मुंडेंचा कोणताही विषय लावून धरला नाही. पण नंतर मी बीड प्रकऱणासह इतर प्रकरणे लावून धरली होती, तेव्हा राजेंद्र घनवट यांचं नाव एका चॅनेलच्या डिबेटमध्ये घेतलं होतं. त्यानंतर मोठ्या प्रमाणात बीडमधील शेतकरी माझ्या घरापर्यंत आले, त्यांनी मला त्यांचे मोठ्या प्रमाणात छळ झाल्याचं सांगितलं. ते राजेंद्र घनवट याचं माणसाने केलेत. आता हा राजेंद्र घनवट कोण आहे.”
अंजली दमानिया यांनी एक छायाचित्र दाखवले, यात राजेंद्र घनवट आणि धनंजय मुंडे दिसत आहेत. धनंजय मुंडे जसे कराडसोबत असायचे तसेच या घनवट सोबत दिसत आहेत. दुसरे छायाचित्र दाखवत दमानिया म्हणाल्या की, व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस, कंपनीबद्दल जी फ्लाय अॅश महाजेनकोकडून घ्यायची आणि बाहेर विकायची. ज्याच्यावर ऑफिस ऑफ प्रॉफिट गुन्हा दाखल व्हावा, यासाठी मी अजित पवार यांच्याकडे तक्रार केली होती. त्या कंपनीचे दोन डायरेक्टर आहेत. पहिल्या राजश्री धनंजय मुंडे आणि दुसरे राजेंद्र घनवट.तिसरा फोटो जगमित्र कंपनीचे डायरेक्टर राजश्री मुंडे, धनंजय मुंडे , वाल्मिक कराड हे देखील होते. आजही घनवट हे या कंपनीत डायरेक्टर म्हणून आहेत.
आनंदाची बातमी ! म्हाडाकडून बांधली जाणार तब्बल 19497 घरे; ‘अशी’ असते अर्ज प्रक्रिया
11 शेतकऱ्यांचे डिटेल्स माझ्याकडे आहेत. या प्रत्येक शेतकऱ्याचा छळ केला आहे. एका शेतकऱ्याची २० कोटींची जमीन होती. त्याचा आठ लाखात व्यवहार केला. एकाची एक कोटीची जमीन होती. त्याचा चार लाखात व्यवहार केला. जेजे त्यांच्याविरूद्ध लढले त्या सर्वांविरोधात त्यांनी गुन्हे दाखल केले. त्याचा छळ केला. माझ्या शेजारी बसलेल्या ताईंच्या कुटुंबियांचाही छळ केला. जे जे शेतकरी त्यांच्या विरोधात लढायचे त्यांच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. माझ्याकडे त्यांचे व्हिडीओज आहेत. राजकारण्यांना हाताशी धरून या बिल्डरांनी शेतकऱ्यांच्या असंख्य जमिनी लाटल्या आहेत. शेतकऱ्याचा छळ करून त्यांना त्रास दिला जात आहे जे त्यांच्याविरोधात लढतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना जेरीस आणलं जातयं.
पोपटलाल घनवटला माझे आव्हान आहेत, माझ्यावर गुन्हा दाखल करा, ते सगळे मी दाखवणार आहे. यांचा संजय ऊर्फ आनंद चव्हाण नावाचा माणूस आहे. त्याच्या नावावर सर्व संपत्ती घेतली जाते. तो कशा पद्धतीने याचा गैरवापर करतो, याचेही पुरावे माझ्याकडे आहेत. यासोबतच पोपट घनवटच्या असंख्य एफआयआर आहेत. माझ्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे या सर्वांवर गुन्हे दाखल करा, त्यांच्या फाईल्स पुन्हा ओपन करण्याची मागणी मी गृहमंत्र्यांकडे करणार आहे.