सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असताना, राष्ट्रवादीमधील ज्येष्ठ नेत्यांची एक फळी भाजपबरोबर सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कुणाची? ही लढाई आता कायद्याच्या चौकटीत जाऊन पोहचलेली असताना, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आजच्या सकाळच्या स्टेटमेंटमुळे राजकीय चर्चांणा उधाण आले होते. त्यांनी कालच्या सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचे समर्थन करीत राष्ट्रवादीत कोणतीही फूट नाही, अजित पवार आमच्या गटाचेच नेते असल्याचे म्हटले होते. परंतु आता त्यांनी या वक्तव्यावरून घूमजाव केला आहे.
शरद पवार यांचे वक्तव्य राज्यभर चर्चेचा विषय
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असल्याचे वक्तव्य करणारे शरद पवार यांनी दुपारी मात्र, या वक्तव्यावरून घूमजाव केला आहे. मी तसे बोललोच नाही, तर सुप्रिया सुळे तशा म्हणाल्या असल्याचे शरद पवार यांनी दुपारी सांगितले. सकाळी अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेले शरद पवार यांचे वक्तव्य राज्यभर चर्चेचा विषय झाला होता. मात्र, आपल्याच वक्तव्यावर दुपारी शरद पवारांनी घूमजाव केला आहे. त्यामुळे कायम संभ्रम ठेवणाऱ्या शरद पवारांच्या भूमिकेवरील संभ्रम आणखीनच वाढला आहे.
शरद पवार यांनी दोन्ही वक्तव्य केली
माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी दोन्ही वक्तव्य केले आहेत. त्यामुळे हा संभ्रम आणखीनच वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नाही. तसेच अजित पवार हे आमचे नेते असल्याचे म्हणालो नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. पक्षातील काही लोकांनी दुसरी भूमिका घेतली, त्यांनी पक्ष सोडला तर त्याला पक्षात फूट पडली असे म्हणता येत नाही. असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. ज्याना जायचे होते, त्यांनी नवीन मार्ग स्वीकारला असेल, तर त्याला फूट पडली असे म्हणता येत नसल्याचेही ते म्हणाले.
सकाळी काय म्हणाले होते शरद पवार
सुप्रिया सुळे, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत, त्यात काही वादच नाही. फूट पडणे याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी होते, जर पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला तर, आज तशी स्थिती येथे नाही. असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. यावर राज्यभरातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. यावरुन अनेक राजकीय अर्थ काढले जात होते.
आता अजित पवारांना संधी नाही
पहाटेच्या शपथ विधीनंतर एकदा संधी दिली होती. आता त्यांनी संधी मागायची नाही तर आम्ही देखील त्यांना संधी द्यायची नाही, अशी आमची भूमिका असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. आता त्यांना संधी द्यायची नसते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांचे नो कॉमेंट्स
अजित पवार आमचेच नेते आहेत, या शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी ‘नो कॉमेंट्स’ अशी प्रतिक्रीया दिली आहे. तसेच, मला या विषयावर काहीच बोलायचे नाही. तुम्ही सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर विचारा ना, असे आवाहनच पत्रकारांना केले
Web Title: I didnt say that sharad pawars rumination on his own statement so ncp activists confused see detailed report on this nryb