मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यासह मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. (State rain and Mumbai Rain) त्यामुळं अनेक ठिकाणी पूरस्थिती (Flood condition) निर्माण झाली आहे. दरम्यान, मुंबईत जोरदार पावसामुळं अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी रस्त्यांची चाळण (Raodn pits) झाली आहे. त्यामुळं यावर्षी सुद्धा मुंबईची तुंबई झाली आहे. “नेमेची येतो पावसाळा, नेमेची पडतात खड्डे” अशी अवस्था आता संपुर्ण मुंबईची झाली आहे. राज्य शासन, महापालिका दरवर्षी कोट्यवधींचा निधी हा रस्त्यांच्या डागडुजीकरिता खर्च करीत असतात तरीही रस्त्यांवरील खड्डे ‘जैसे थे’ असून ही गंभीरबाब आहे. मुंबईकरांच्या पैसा खड्ड्यात जात असा आरोप आम आदमी पार्टीचे नेते गोपळ झवेरी यांनी केला. (Aam Aadmi Party leader Gopal Zaveri alleged that Mumbaikars’ money was going to waste)
[read_also content=”…तर पुन्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल – जयंत पाटील https://www.navarashtra.com/maharashtra/then-the-mahavikas-aghadi-government-will-come-to-the-state-again-jayant-patil-303863.html”]
दरम्यान, मुंबईतील रस्त्यांची झालेली दुर्दशा अतिशय वाईट आह. तसेच शहरातील खड्डय़ांच्या समस्यांबाबत मुंबई महानगरपालिकेचा दावा किती फोल आहे, हे दाखवण्याकरिता आम आदमी पार्टीने (AAP) मुंबई भर ‘आय लव्ह खड्डा’ ही अनोखी मोहीम राबवली. आय लव्ह खड्डा’ मोहीम राबवत असताना कफ परेड, कुलाबा, वाकोला, चेंबूर, खार, जोगेश्वरी पश्चिम, भांडुप, अंधेरी पश्चिम, चर्चगेट, बोरिवली, मालाड, गोरेगाव आणि मानखुर्द (Cuff Parade, Colaba, Wakola, Chembur, Khar, Jogeshwari West, Bhandup, Andheri West, Churchgate, Borivali, Malad, Goregaon and Mankhurd) यांसारख्या वैविध्यपूर्ण भागात खड्डे दिसून आले. त्यामुळं या भागात ‘आय लव्ह खड्डा’ ही अनोखी मोहीम राबवत मनपा प्रशासनाचा निषेध केला.
पुढे बोलताना झवेरी म्हणाले की, मागील २४ वर्षात मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील रस्त्यांवर २९,००० कोटी रुपये खर्च केले असून, मुंबईतील फक्त ८०० किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे. यासोबतच कंत्राटदारांच्या देखरेखीच्या अभावामुळे खड्डे हे मुंबईतील रस्त्यांचे कायमस्वरूपी ठिकाण बनले असून त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन मृत्यूही ओढवला आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत १५० लोकांचा मृत्यू झाला असून, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मुंबईतील खड्ड्यांमुळे अतिरेकी हल्ल्यापेक्षाही जास्त मृत्यू होतात, अशी टिका गोपाल झवेरी यांनी त्यावेळी केली.