इराण इस्रायल मध्य पूर्व युद्धाच्या परिस्थितीमध्ये दुबईहून भारतीय मुंबईत परतले (फोटो - AI)
मुंबई : अमेरिका आण इस्त्रायल या दोन्ही देशांकडून इराणवर जोरदार हल्ले केले जात आहेत. त्यातच इस्रायलमध्ये जे युद्ध US Israel VS Iran War सुरु झालं आहे, ज्यानंतर अनेक भारतीय आखाती देशांमध्ये अडकले आहेत. महाराष्ट्रातल्या पर्यटकांना आम्ही सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत. गिरीश महाजन यांना यासंदर्भातली जबाबदारी दिली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली.
सध्या इराण आणि इस्त्रायल यांचे युद्ध सुरु आहे. त्यानंतर भारतीय पर्यटक किंवा व्यवसायासाठी जे लोक गेले, त्यांचे मेसेज आपल्याला येऊ लागले. त्यानंतर आपण केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क केला. त्यांनी दूतावासाशी संपर्क करायला सांगितले. आपल्या राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत गिरीश महाजन यांना आपण ती जबाबदारी दिली आहे. आपण डब्ल्यूए नंबर दिला आहे, तिथल्या लोकांच्या लोकांना परत आणण्याचे प्रयत्नही आपण सुरु केले आहेत.
हेदेखील वाचा : Donald Trump: इराणचा बदला अन् पाकिस्तानी मोहरा! हॉटेलच्या खोलीत ‘असा’ ठरला ट्रम्पच्या हत्येचा मास्टरप्लॅन; बनले युद्धाचे कारण
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, एअर इंडियाची विमाने आता हळूहळू जात आहेत आणि लोकांना परत आणत आहेत. काही एअर स्पेसेस सुरु आहेत तर काही बंद आहेत. जिथून आणता येणे शक्य आहे तिथून आणले जात आहे. ही जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे दिली असून, तिथल्या लोकांच्या संपर्कात ते आहेत, असे फडणवीस म्हणाले.
दूतावासाची बैठक घेऊन SOP दिल्या
कुवेतमध्ये हा प्रश्न निर्माण झाला होता, कारण ट्रांझिटचे लोक तिथे आहेत, त्यांच्याकडे व्हिसा नसल्याने अडचणी होत्या. पण आता प्रयत्नपूर्वक त्यांना एका ठिकाणी थांबवले आहे. आपले जे चीफ ऑफ प्रोटोकॉल आहेत त्यांनाही आपण जबाबदारी दिली होती. आपल्या दूतावासाची बैठक घेऊन तिथल्या नागरिकांना एसओपी दिल्या आहेत.
हेदेखील वाचा : US Iran War : भारताच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिकेचा इराणवर निशाणा? सरकारने उधळला अफवांचा डाव






