पनवेल : पनवेल पालिका क्षेत्रात या आधी भटक्या कुत्र्यांची दहशद मोठ्या प्रमाणात बघायला मिळत होती. भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण प्रक्रिया करण्याकरिता पालिकेकडून या आधी दोनवेळा निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. पनवेल पालिका प्रशासनाकडून युद्ध पातळीवर हालचाल सुरु करून पुन्हा एकदा निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. एजन्सी नेमण्यात आल्यानंतर कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु झाल्यावर आतापर्यंत चार हजारांच्या आसपास कुत्र्यांची दहशत मोठया प्रमाणात कमी झाली असून कुत्र्यांचे निर्बीजीकरण केल्यामुळे वयोवृद्ध तसेच लहानमुलांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचे आयुक्त डॉ.प्रशांत रसाळ यांनी नवराष्ट्रला सांगितले.
[read_also content=”‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आता सिनिअर सिटीझनही होणार लोटपोट https://www.navarashtra.com/movies/in-madness-machaenge-india-ko-hasaenge-senior-citizens-will-also-be-featured-540455.html”]
पनवेल परिसराचे नागरिकीकरण मोठया प्रमाणात वाढत असून सिडकोचा मोठा परिसरात या महसुली विभागात येतो. पूर्वी घर आणि शेतीचे राखण करण्यासाठी प्रत्येक घरी कुत्रे पाळले जायचे. हा प्राणी अतिशय प्रामाणिक असून तो रखवालदाराची भूमिका पार पाडीत असे. मात्र नागरीकरणाची कक्षा रूंदावल्याने शेती व्यवसाय जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी आता कुत्रे पाळण्याचा कलही कमी झाला आहे. ज्यांना कोणाला आवड आहे ते विदेशी प्रजातीचे कुत्रे पाळतात. मात्र देशी कुत्रे आता निराधार झाले आहेत. परिणामी दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली असून त्यांचे निर्बिजीकरण होताना दिसत नाही.
शहरी भागाचा विचार करता नवीन पनवेल, कऴंबोली, खांदा वसाहत, कामोठे, खारघर या नोडमध्ये मंध्यतरी नसबंदीचे काम बंद पडले होते. मागील वर्षभरामध्ये हजारो कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले असा दावा सिडको करीत आहे. परंतु रस्त्यावरील कुत्र्यांची दहशत कमी झालेली नाही. सर्वात धोकादायक आणि दहशतीचे वातावरण आहे ते म्हणजे पनवेल शहरात. काही वर्षांपूर्वी न्यायालयाच्या पाठीमागे असलेल्या जागेवर निर्बिजीकरणाकरीता निवारा उभारण्यात आला होता. याकरीता खाजगी एजन्सी नियुक्त करण्यात आली होती. मात्र ही एजन्सी आपला गोठड गुडांळून गेली. दरवाजे खिडक्या आणि छप्परसुध्दा ते बरोबर घेऊन गेले. त्यानंतर आज तागायत पालिकेने निर्बिजीकरणाकरीता एजन्सी नियुक्त केली नव्हती. परंतु आता निर्बिजीकरण करण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्यात आली असून भटक्या कुत्र्यांनवर पालिकेचे बारीक लक्ष असल्याचे आयुक्त रसाळ यांनी सांगितले.