Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मागील 10 वर्षात कल्याण पूर्वेत अनेक महत्त्वाची कामे झाली – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

रेल्वेची पाचवी आणि सहावी लाईन कार्यान्वित झाली असून त्यामुळे एक्स्प्रेसला स्वतंत्र मार्ग उपलब्ध झाल्याने लोकलच्या फेऱ्या वाढल्या आहेत, अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 29, 2024 | 01:45 PM
मागील 10 वर्षात कल्याण पूर्वेत अनेक महत्त्वाची कामे झाली – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : कल्याण पूर्वेत मागील 10 वर्षात अनेक महत्त्वाची कामे झाली असून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ही कामे मतदारांपर्यंत पोहोचवावीत, असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. कल्याण पूर्वेतील महायुतीच्या पदाधिकारी संवाद मेळाव्यात खासदार शिंदे बोलत होते.

कल्याण पूर्व येथील मॉडेल शाळेच्या मैदानात रविवारी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला. यावेळी बोलताना मागील 10 वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पूर्वेत चक्की नाका-मलंगगड रोड, कल्याण शीळ रोड, पत्री पूल, अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रिटचे रस्ते अशी अनेक कामे झाल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. कल्याण रेल्वे यार्ड रिमॉडेलिंग हा 800 कोटींचा प्रकल्प प्रगतीपथावर असून याचा कल्याणकरांना मोठा फायदा होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कल्याणकरांचा बोगद्याचा प्रवास बंद होणार असून थेट रेल्वे स्थानकात जाता येणार आहे. रेल्वेची पाचवी आणि सहावी लाईन कार्यान्वित झाली असून त्यामुळे एक्स्प्रेसला स्वतंत्र मार्ग उपलब्ध झाल्याने लोकलच्या फेऱ्या वाढल्या आहेत, अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली.

तसेच कल्याण पूर्वेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती, पण आपण त्यापलीकडे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक भव्य स्मारक कल्याण पूर्वेत उभारले, असे त्यांनी यावेळी सांगितले. ही निवडणूक देशाची निवडणूक असून आपली ही कामे पुढे नेण्यासाठी कल्याणची जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे, असे यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या. तर राज्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गेल्या अडीच वर्षात तब्बल 125 कोटी रुपये दिले, ज्याचा गोरगरीब रुग्णांना मोठा फायदा झाला. गोरगरिबांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून खोणी आणि शिरढोण येथे घरे बांधण्यात आली.

राज्यात महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, तर ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास राज्य सरकारने उपलब्ध करून दिल्याचे सांगत ही निवडणूक एका व्यक्तीची नव्हे, तर देशाची असल्याचे शिंदे यांनी सांगितले. यासाठीच आपण केलेली कामे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून मतदानाची टक्केवारी कशी वाढेल, यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी आमदार जगन्नाथ शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, कल्याण जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे, रमेश हनुमंते, भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमाकांत देवळेकर, विधानसभा प्रमुख निलेश शिंदे, प्रशांत काळे यांच्यासह महायुतीच्या घटकपक्षांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: In the last 10 years many important works have been done in kalyan east mp dr shrikant shinde loksabha elections 2024 maharashtra thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2024 | 01:45 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • kalyan
  • loksabha elections 2024
  • maharashtra
  • mp dr shrikant shinde
  • shivsena
  • thane

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.