हर्षवर्धन पाटील यांना निवडणूक कठीण जाणार? (फोटो- टीम नवराष्ट्र)
हेही वाचा: Indapur Election: इंदापूरमध्ये टफ फाईट होणार; ‘या’ नेत्याच्या उमेदवारीचा नेमका कोणाला होणार फायदा?
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दिवाळी संपताच प्रचार सभांना सुरुवात झाली आहे. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक ठिकाणी बंडखोरी रोखण्यात महायुती आणि महाविकास आघाडील यश आले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २० तारखेला मतदान होणार आहे. तर मतमोजणी २३ तारखेला होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर ही पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. इंदापूरची जागा भाजपला जाणार नाही आणि त्यामुळ आपल्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याचे हर्षवर्धन पाटील यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना महाविकास आघाडीकडून इंदापूरची उमेदवारी मिळाली आहे. आधी दुहेरी असणारी लढत आता तिरंगी होणार आहे.