रणजीत शिंदे यांचे मतदारांना भावनिक आवाहन (फोटो- टीम नवराष्ट्र)
टेंभूर्णी: मागील 30 ते 35 वर्षांत आमदार बबनदादांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर मी सफरचंद या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवित आहे. मतदारसंघात भीमा-सीना जोडकालवा,सीना-माढा उपसासिंचन योजना कार्यान्वित केली,बार्शी उपसासिंचन योजनेतून माढा तालुक्यातील चार गावांना पाणी,साखर कारखाने उभे करून सातत्याने एफआरपी पेक्षा जास्त दर ऊसाला दिला,ठिकठिकाणी सबस्टेशन व नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून वीजेचा प्रश्न सोडविला, कोट्यावधींच्या निधीतून रस्त्यांचे डांबरीकरण केले, शैक्षणिक व आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.विविध प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.
जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याने मतदारसंघात चौफेर विकास झाला आहे ही वस्तुस्थिती असताना विरोधकांकडे विकासकामाचा कसलाही अजेंडा नसल्यामुळे ते नुसता खोटा प्रचार व जनतेची दिशाभूल करीत आहेत. शासनाकडून तत्वतः अंतिम मंजुरी घेतलेली खैराव-मानेगाव उपसासिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी आणि भीमा व सीना नदीवर ठीकठिकाणी मोठे बॅरेजेस बांधण्यासाठी आमदारकीची संधी द्यावी असे आवाहन माढा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रणजीत बबनराव शिंदे यांनी मतदारांना केली आहे. ते वडशिंगे ता.माढा गुरुवारी 14 नोव्हेंबर रोजी प्रचारार्थ विराट जाहीर सभेत बोलत होते.
हेही वाचा: “माढा तालुक्याला कुणाची दृष्ट लागू देऊ नका”; मुलासाठी बबनराव शिंदेंकडून मतदारांना भावनिक साद
यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत यांनी सांगितले की,अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांना आम्ही जाहीर पाठिंबा दिल्यापासून विरोधक हतबल व अस्वस्थ झाले आहेत.अनेकांना आपली राजकीय किंमत कमी होणार असल्याने मोठा धक्का बसला आहे.आम्ही तालुक्यातील दोन्ही बलाढ्य शक्ती एकत्र आल्याने विरोधी उमेदवार व विरोधकांची अक्षरशः झोप उडाली आहे. पक्षातील वरिष्ठ राजकीय नेतेमंडळींकडे आम्ही मागणी करुनही या निवडणुकीत न्याय न दिल्याने पुढील पिढीचे राजकीय भवितव्य अंधकारमय होऊ नये.बाहेरील विघातक शक्तीचे तालुक्यात राजकीय आक्रमण होऊ नये यासाठी मी विचारपूर्वक ठाम भूमिका घेतली आहे.रणजीत शिंदे हे विकासाची दृष्टी व नाविन्यपूर्ण उपक्रमाची व्हिजन असणारे उच्चविद्याविभूषित उमेदवार आहेत त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा: “माढा तालुक्याला कुणाची दृष्ट लागू देऊ नका”; मुलासाठी बबनराव शिंदेंकडून मतदारांना भावनिक साद
यावेळी आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले की,विरोधी उमेदवारांकडे विकासाची कसलीही दृष्टी नाही.नुसती भ्रामक व नकारात्मक टीका करुन मते मागण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.सध्या ते खोटेनाटे बोलून सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांची फसवणूक व दिशाभूल करीत आहेत. स्वतःला राज्याचे व जिल्ह्याचे नेते समजणा-यांना माळशिरस तालुक्यात आजतागायत एक एमआयडीसी सुरू करता आली नाही.माझ्या साखर कारखान्याप्रमाणे कधीही ऊसाला दर दिला नाही.याउलट मी माढा तालुक्यात तीन एमआयडीसी सुरू केल्या आहेत.ऊसाचे विक्रमी गाळप करून सातत्याने जिल्ह्यात सर्वाधिक दर दिला आहे.मी सुरू केलेल्या जलसिंचन योजनांमुळे तालुक्यात 40 लाख टन ऊसाचे उत्पादन झाले आहे.राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यान्वित होताना मी ही सत्तेत होतो आणि पाठिंबा दिला होता हे लक्षात घेऊन मतदार भगिनींनी रणजीत शिंदे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.