DC चा RCB समोर २०४ धावांचे लक्ष्य(फोटो-सोशल मीडिया)
DC vs RCB, WPL 2026 Final : महिला प्रीमियर लीग २०२६ चा अंतिम सामना आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर सुरू आहे. या सामान्यात टॉस गमावणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करत जेमिमाह रॉड्रिग्सच्या अर्धशतकाच्या जोरावर ४ गडी गमावून २०३ धावा केल्या आहेत. आरसीबीला जेतेपद आपल्या नावे करायचे असले तर २०४ धावा कराव्या लागणार आहेत. आरसीबीकडून अरुंधती रेड्डीने १ विकेट घेतली.
वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या महिला प्रीमियर लीग २०२६ च्या अंतिम सामन्यात टॉस जिंकून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर दिल्ली कॅपिटल्सला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. दिल्लीची सुरुवात चांगली झाली. लिझेल ली आणि शफाली वर्मा या सलामी जोडीने संघाला ४९ धावांची सलामी दिली. त्यानंतर शफाली वर्मा २० धावा करून बाद झाली. शफालीला अरुंधती रेड्डीने बाद केले. तिच्या नंतर लॉरा वोल्वार्ड मैदानात आली. त्यानंतर दिल्लीला लिझेल लीच्या रूपात दूसरा धक्का बसला. ली ३० चेंडूत ३७ धावा करून माघरी गेली. याखेळीत तिने ३ चौकार आणि ३ षटकार लगावले. तिला नादिन डी क्लार्कने बाद केले. दिल्लीच्या दोन विकेट्स गेल्यावर दिल्लीचा डाव लॉरा वोल्वार्ड आणि कर्णधार जेमिमाह रॉड्रिग्स यांनी सांभाळला. या दोघींनी ७२ धावांची भागीदारी रचली.
कर्णधार जेमिमाह रॉड्रिग्सने ३२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि संघाला संकटातुन बाहेर काढले. त्यानंतर मात्र जेमिमाह रॉड्रिग्स ३७ चेंडूत ८ चौकरांच्या मदतीने ५७ धावांची खेळी करून माघारी गेली. तिला सायली सातघरेने आपली शिकार केली. त्यानंतर लॉरा वोल्वार्ड आणि चिनेल हेन्री यांनी सर्व मोर्चा सांभाळला. या दोघींनी अखेरच्या काही षटकात चांगलीच आक्रमकता दाखवली. या दोघींनी ५५ धावांची भागीदारी रचत संघाला २०३ पर्यंत पोहचवले. लॉरा वोल्वार्डने २५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४४ धावा केल्या. ती अखेरच्या चेंडूवर धाव बाद झाली. तर चिनेल हेन्री १५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकरांच्या मदतीने ३५ धावा करून नाबाद राहिली. आरसीबीकडून अरुंधती रेड्डी, सायली सातघरे आणि नादिन डी क्लार्क यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
Innings Break! @DelhiCapitals register the highest total in a #TATAWPL Final 🔥 Will they defend it or will #RCB chase it down? 🤔 History awaits on the other side ⏳ Scorecard ▶️ https://t.co/9sgUo0YqOI#TATAWPL | #ClaimTheCrown | #RCBvDC pic.twitter.com/3CxX6qyQE8 — Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 5, 2026
हेही वाचा : DC vs RCB, WPL 2026 Final : DC साठी उभी राहिली कर्णधार! जेमिमाह रॉड्रिग्सने झळकवले शानदार अर्धशतक
दिल्ली कॅपिटल्स महिला प्लेइंग इलेव्हन: लिझेल ली (डब्ल्यू), शफाली वर्मा, लॉरा वोल्वार्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (सकर्णधार), मारिझान कॅप, चिनेल हेन्री, निकी प्रसाद, स्नेह राणा, मिन्नू मणी, श्री चरणी, नंदनी शर्मा
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला प्लेइंग इलेव्हन: ग्रेस हॅरिस, स्मृती मानधना (कर्णधार), जॉर्जिया वॉल, रिचा घोष (डब्ल्यू), राधा यादव, नादिन डी क्लार्क, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, सायली सातघरे, श्रेयंका पाटील, लॉरेन बेल






