कोल्हापूर : कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी (India Election Results 2024) येथील शासकीय धान्य गोदामात, तर हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव येथील जलसंपदा विभागाच्या गोदामात सुरू आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला.
पहिल्यांदा पोस्टल मतं मोजण्यात आले. सुरूवातीच्या टपाली मतदानामध्ये काँग्रेस उमेदवार शाहू महाराज आघाडीवर होते. मतांची सतत आकडेवारी वाढतच गेली. पाचव्या फेरीअखेर शाहू महाराजांना १,०५,७२३ मते मिळाली. २६३२६ मतानी आघाडी घेतली आहे. तर संजय मंडलिक शिवसेना (शिदे गट) यांना ७९,३९७ मिळाली. सध्या ते २६३२६ मतानी पिछाडीवर आहेत.
तसेच हातकणंगलेत सत्यजित पाटील विरुद्ध धैर्यशील माने यांच्यात लढत होत आहे. त्यामध्ये सत्यजित पाटील यांना ७९,३४९ मते मिळाली आहेत. यामध्ये ३८१८ मताची आघाडी घेतली आहे. या ठिकाणी धैर्यशील माने पिछाडीवर आहेत. राजू शेट्टी ५६,००० हजार मतांनी पिछाडीवर आहेत.