Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel-Iran War : दुबईत अडकलेल्या भारतीयांना घेऊन पहिले विमान मुंबईत दाखल; पर्यटकांनी सांगितली थरारक आपबीती

Indian Return From Dubai : मध्यपूर्व भागामध्ये युद्धाची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक भारतीय हे दुबईमध्ये अडकले आहेत. त्यांना परत भारतामध्ये आणणारे विमान मुंबईमध्ये दाखल झाले.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 03, 2026 | 10:58 AM
Indian return to mumbai from dubai Iran Israeli Middle East Conflict Marathi news

Indian return to mumbai from dubai Iran Israeli Middle East Conflict Marathi news

Follow Us
Close
Follow Us:
  • Israel-Iran युद्धपरिस्थितीमध्ये अडकले भारतीय
  • दुबईहून भारतीय प्रवाशांना घेऊन विमान मुंबईत दाखल
  • मायदेशी परतल्यावर प्रवाशांनी सांगितला अनुभव
Indian Return From Dubai : मुंबई : इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यामुळे युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणने देखील दुबईवर जोरदार हल्ला केला आहे. मध्यपूर्व भागामध्ये युद्धाची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार बॉम्ब हल्ले आणि क्षेपणास्त्रे हल्ले केले जात आहेत. यामध्ये इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई (ayatollah ali khamenei) यांची हत्या झाल्यामुळे इराण आक्रमक झाला आहे. या युद्धाच्या परिस्थितीमध्ये हजारो भारतीय हे मध्यपूर्व आखाती देशांमध्ये अडकले आहेत. यामध्ये दुबईतील पहिले विमान हे भारतीयांना घेऊन सुरक्षित मुंबईमध्ये (Mumbai News) दाखल झाले आहे.

 

इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु झाल्याने याचा विपरित परिणाम हवाई उड्डाणांवर झाला आहे. यामुळे विमान सेवा ठप्प पडली आहे. तसेच आखाती देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. तसेच दुबई विमानतळही बंद करण्यात आले होते आणि अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. यामुळे विमानतळांवर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली होती. तसेच हजारो भारतीय पर्यटक हे या देशांमध्ये अडकले होते. या सर्वांना सुरक्षित भारतामध्ये परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय पूर्ण प्रयत्न करत होते. अखेर प्रवाशांना घेऊन पहिले विमान मुंबईमध्ये दाखल झाले आहे.

हे देखील वाचा : इराणचा ‘विनाशकारी सूड’! खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच; सौदीतील दूतावासावर हल्ला
Israel and US VS Iran : मध्यपूर्वेतील युद्धाने विनाशका

युद्धजन्य अशा परिस्थितीत काल रात्री सुमारे दोन वाजता दुबईहून एक फ्लाइट मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. यावेळी प्रवाशांनी त्यांच्यावर आलेले आपबीती सांगितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे दुबईहून आलेले विमान पोहचले आहे. यावेळी अजय नावाच्या एका प्रवाशाने त्याचा दुबईचा थरारक अनुभव सांगितला. तो म्हणाला की, “आम्ही मुंबईहून हैदराबाद आणि तेथून दुबईला पोहोचलो होतो. दुबईहून आमची पुढील फ्लाइट अमेरिकेसाठी होती. आम्ही सर्वजण विमानात बसलोही होतो. जेव्हा विमानाने उड्डाण घेतले नाही तेव्हा चौकशी करण्यात आली. सुरुवातीला काही तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे 7-8 तास निघून गेले. त्यानंतर आम्हाला सांगण्यात आले की युद्ध सुरू झाले आहे, त्यामुळे सध्या उड्डाण करता येणार नाही,” अशी माहिती प्रवासी अजयने दिली आहे.

पुढे तो म्हणाला की, “त्यानंतर विमानतळावर मोठी धावपळ उडाली. परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती. त्यानंतर एमिरेट्सच्या बसेस आणि गाड्या विमानतळावर आल्या आणि आम्हाला हॉटेलपर्यंत सोडण्यात आले. मात्र त्यानंतरही आम्ही संपूर्ण रात्र हॉटेलच्या शोधात भटकत राहिलो. 10-12 तास भटकल्यानंतर आम्हाला एक हॉटेल मिळाले. या दरम्यान आम्ही बॉम्बस्फोटांचे आवाजही ऐकले. तसेच बुर्ज खलिफा परिसरात धुराचे लोटही पाहिले. या काळात आम्हाला हॉटेलमधून बाहेर पडण्यास आणि खिडक्यांजवळ उभे राहण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. आम्ही जेवण न करता फक्त आमच्या खोलीतच थांबत होतो. बाहेर नेमके काय सुरू आहे,” याची आम्हाला काहीच माहिती नव्हती, असे भारतीय प्रवाशांनी सांगितले आहे.

हे देखील वाचा : Israel Iran युद्धात दुबई पुन्हा पेटलं! इराणचा भीषण ड्रोन हल्ला अन् क्षणात सर्व नष्ट; जगभरात खळबळ

संबंधित प्रवाशाने सांगितले की, “हॉटेलमध्ये जागा न मिळाल्यामुळे अनेकजण जिथे जागा मिळेल तिथे राहत होते. दुबईतील सध्याच्या परिस्थितीबाबत सांगितले की, आता हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येत आहे. मात्र दोन दिवस परिस्थिती अत्यंत गंभीर होती. आता तेथील लोक थोडे निश्चिंत झाले आहेत. मुंबईकडे येणाऱ्या फ्लाइटची माहिती मिळताच आम्ही एमिरेट्सकडे विनंती केली. त्यानंतर आम्हाला वाहनाची व्यवस्था करून देण्यात आली आणि आम्ही आमची फ्लाइट पकडली,” अशी माहिती अजयने दिली आहे.

Web Title: Indian return to mumbai from dubai iran israeli middle east conflict marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • Dubai
  • Iran-Israel War
  • mumbai airport

संबंधित बातम्या

World War 3 : “कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास..”; परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी मेधा कुलकर्णींचा मदतीचा हात
1

World War 3 : “कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास..”; परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी मेधा कुलकर्णींचा मदतीचा हात

Iran-Israel War: होर्मुझ बंद करण्याचा इराणचा इशारा; तेलमार्गावर युद्धाचे सावट
2

Iran-Israel War: होर्मुझ बंद करण्याचा इराणचा इशारा; तेलमार्गावर युद्धाचे सावट

Israel-Iran War: पंतप्रधान मोदींचे कौतुक करणं पडलं महागात, अभिनेत्रीला करावा लागला ट्रोल्सरचा सामना; नेमकं प्रकरण काय?
3

Israel-Iran War: पंतप्रधान मोदींचे कौतुक करणं पडलं महागात, अभिनेत्रीला करावा लागला ट्रोल्सरचा सामना; नेमकं प्रकरण काय?

Israel-Iran War : इस्त्रायलची मोठी तयारी; आयर्न बीम रॉकेट युद्धभूमीवर तैनात
4

Israel-Iran War : इस्त्रायलची मोठी तयारी; आयर्न बीम रॉकेट युद्धभूमीवर तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.