संग्रहित फोटो
महापािलका निवडणुुकीसाठी प्रशासकीय प्रक्रीयांचे टप्पे पार पडत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपुर्वी प्रभाग निहाय आरक्षण पार पडले. गेल्या आठवड्यात प्रभाग निहाय मतदार यादी जाहीर केल्या गेल्या आहे. या मतदार याद्यांमध्ये घाेळ असल्याचे आढळून येऊ लागले आहे. गेल्या दाेन दिवसांत निवडणुक कार्यालयाकडे माेठ्या प्रमाणावर तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. साेमवारी संध्याकाळ पर्यंत निवडणुक कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ४१९ हरकती, तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
महाविकास आघाडीकडून सातत्याने मतदार याद्यांबाबत टिका केली जात आहे. प्रभागाच्या सीमा लगतच्या भागातील मतदारांची नावे ही शेजारच्या प्रभागात जाणीव पुर्वक टाकल्याचा आराेप हाेत आहे. त्याचवेळी याद्या फाेडताना साॅफ्टवेअरचा वापर केल्याने गंभीर बाबी समाेर येऊ लागल्या आहेत. यादी फाेडताना झालेल्या चुकांमुळे प्रभागच नाही तर दुसऱ्याच लाेकसभा मतदारसंघात मतदारांची नावे गेल्याचे आढळून आले आहे. मुंढवा भागातील मतदारांची नावे ही वारजे येथील मतदारयादीत गेली आहेत. बारामती लाेकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या खेड शिवापुर भागातील मतदारांची नावे ही सन सिटी प्रभागात, तसेच नवी पेठेतील एका साेसायटीतील मतदारांची नावे ही सनसिटी प्रभागात दाखविली गेली आहे.
याबाबत प्रशासनाकडून कबुली दिली गेली असून, याविषयी राज्य निवडणुक आयाेगाला कळविण्यात आल्याचे सांगण्यात आले. मतदार याद्यातील घाेळाविषयी महाविकास आघाडीकडून पुढे काय भुमिका घेतली जाणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मतदारांनी त्यांचे नाव शाेधण्यासाठी http://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/SearchName या लिंकचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मतदार यादीवर हरकत नाेंदविण्याच्या संख्येत वाढ हाेत आहे. साेमवारी संध्याकाळपर्यंत ४१९ हकरती, तक्रारी नाेंदविल्या गेल्या आहेत. तर मतदार याद्यांची विक्री वाढली असून, एकुण १३ लाख ३० हजार रुपयाहून अधिक महसुल यातून जमा झाला आहे.
आरक्षणासंदर्भात २४ हरकती
प्रभागात टाकण्यात आलेल्या आरक्षणाविषयी हरकती नाेंदविण्यासाठी साेमवारपर्यंत मुदत हाेती. निवडणुक कार्यालयाकडे २४ हरकती प्राप्त झाल्या असुन, यामध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये सर्वांत जास्त सहा हरकती आल्या आहेत. या प्रभागातील एका गटात अनुसुचित जातीच्या महीलांसाठी आरक्षण टाकले आहे. ते आरक्षण पुरुषांसाठी बदलावे अशी हरकत नाेंदविली गेली आहे. प्रभाग क्रमांक नऊ मध्ये दाेन हरकती आल्या आहेत, या ठिकाणी अनुसुचित जाती या वर्गाची संख्या दुप्पट झाली असुन, येथे ते आरक्षण देणे आवश्यक असल्याचे हरकतीत नमूद केले आहे.






