File Photo : Physical Harassment
नागपूर : इन्स्टाग्राम मित्राने (Instagram Friend) एका बालिकेला प्रेमात अडकवून लैंगिक शोषण केले. पीडिता गर्भवती (A Girl Pregnant) झाल्याने ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी 17 वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे.
गुलशन उर्फ गोल्डी धनराम हरीनखेडे (वय 20 रा. एमआयडीसी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गोल्डी खासगी संस्थेत काम करतो. पीडित बालिका बारावीची विद्यार्थिनी आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये पीडितेची इन्स्टाग्रामवर गुलशनशी मैत्री झाली. दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले. या दरम्यान गुलशनने पीडितेला प्रेमपाशात अडकवले. तिला भेटण्यासाठी बोलावले. लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांपूर्वी गुलशनचे तिच्या मैत्रिणीशी सूत जुळले. यामुळे त्याने पीडितेपासून दुरावा केला. भेटी-गाठी आणि बोलणे बंद केले.
गुलशन अचानक बदलल्याने पीडितेला संशय आला. तिने माहिती काढली असता त्याने आपल्याच मैत्रिणीला जाळ्यात अडकवल्याचे तिला समजले. या दरम्यान पीडितेला गर्भवती असल्याचे समजले. तिने याबाबत गुलशनला सांगून लग्नासाठी दबाव टाकला. मात्र, त्याने स्पष्ट नकार दिला. शेवटी पीडितेने घटनेची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून गुलशनला अटक केली.






