Investment Fraudster Arrested 15 Lakh 40 Thousand Rupees Seized By The Police Nrdm
गुंतवणुकीच्या आमिषाने साडे पंधरा लाखांचा गंडा; गुजरातमधून आरोपीला घेतले ताब्यात
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फ़ायदा हाईल असे सांगून एकाची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्याला चिखली पोलिसांनी गुजरात येथे जाऊन बेड्या ठोकल्या. दिनेश पथुजी ठाकोर (26 रा. छाबलीया, गुजरात) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पिंपरी : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फ़ायदा हाईल असे सांगून एकाची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्याला चिखली पोलिसांनी गुजरात येथे जाऊन बेड्या ठोकल्या. दिनेश पथुजी ठाकोर (26 रा. छाबलीया, गुजरात) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे 2023 मध्ये चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका व्यक्तीस फोन करुन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळत असल्याच्या योजना सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानुसार फिर्यादी यांनी प्रथम 50 हजारांची गुंतवणूक केली. त्याच्या मोबदल्यात त्यांना सव्वा लाखाचा नफ़ा झाल्याचे दर्शविण्यात आले.
पुन्हा गुंतवणूक करण्यास सांगून, फिर्यादी यांना डीमट खाते काढून देण्याचे आश्वासन देऊन गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करण्यात आले. तसेच चेतन पटेल व संजय पटेल यांच्या मार्फत ट्रेडींग करा, असे सांगून फिर्यादीस वेळोवेळी गुंतवणूक करण्यास भाग पाडून आरोपीने फिर्यादी यांना वेळोवेळी तुमचा तोटा झाला आहे. तो तुम्ही पैसे भरा, पैसे भरले नाही तर पोलीस केस होइल अशी धमकी देवून फिर्यादी यांच्याकडून एकूण 15 लाख 47 हजार 259 रुपये घेतले. फिर्यादी यांना त्यांच्या नावाने डी मॅट खातेच नसल्याचे समजल्यानंतर त्यानी दिलेल्या तक्रारीवरुन चिखली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासात चिखली पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने संभाषणासाठी वापरण्यात आलेले फोन, फिर्यादीने पैशाचे व्यवहार करताना वापरलेली बॅंक खाती याचे तांत्रिक दृष्टीने विश्लेषण करुन आरोपीचा शाेध घेतला. आरोपीचा मोबाईल बंद असल्यामुळे व तो व्हॉटसअपवर संपर्कात राहत असल्याने त्याचे लोकेशन मुंबई, सुरत, अहमदाबाद, गुजरात अशा वेगवेगळ्या ठिकाणी येत होते. त्यामुळे आरोपीला शोधण्याचे मोठे अव्हान पोलीसांसमोर होते.
तांत्रिक तपासाच्या आधारावर आरोपी हा त्याचे मूळ गावी गुजरात या ठिकाणी पळून गेला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी एक पथक गुजरात येथे पाठवून आरोपीला अटक केली. आरोपीने गुन्हा केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यामधील 15 लाख 47 हजार 259 रुपये जप्त केले. ही कामगिरी चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोगले, पोलीस हवालदार गोडांबे, मोहिते यांनी केली.
Web Title: Investment fraudster arrested 15 lakh 40 thousand rupees seized by the police nrdm