हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि आनंददायी सण म्हणजे दिवाळी. या सणाचा सर्वात महत्त्वाचा दिवस तो म्हणजे लक्ष्मीपूजन. जो अमावस्येच्या रात्री साजरा केला जातो. पण नेमकं लक्ष्मीपूजन अमावस्येलाच का केलं जातं, यामागे धार्मिक, आध्यात्मिक आणि खगोलशास्त्रीय कारणं आहेत.
अमावस्या म्हणजे चंद्र नसलेली पूर्ण काळोखी रात्र. अंधाराचं प्रतीक म्हणजे तमोगुण. या दिवशी अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि दु:खावर सुखाचा विजय मिळवण्यासाठी लक्ष्मीदेवीचं पूजन केलं जातं. दिव्यांचा प्रकाश म्हणजे समृद्धी आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच अमावस्येच्या दिवशी घराघरांत दिवे लावले जातात आणि देवी लक्ष्मीचं स्वागत केलं जातं.
पौराणिक कथेनुसार, या दिवशी समुद्रमंथनातून लक्ष्मीदेवीची निर्मिती झाली. त्यामुळे अमावस्येच्या रात्री देवी पृथ्वीवर भ्रमण करते, असं मानलं जातं. अमावस्या म्हटली की प्रत्येक वेळी धडकी भरते मात्र अमावस्येकडे सकारात्मक पद्धीतीने कसं पहावं हे दिवाळीचा सण सांगतो. असं म्हणतात, ज्या घरात स्वच्छता, शांती आणि प्रकाश असतो तिथं ती स्थायिक होते. म्हणून दिवाळीपूर्वी घराची स्वच्छता करून दिवे, तोरणं आणि फुलांनी सजावट करण्याची प्रथा आहे. ही झाली अध्यात्मिक बाजू. अमावस्येला लक्ष्मीपूजन असल्यामागे खगोलशास्त्रीय अभ्यास देखील आहे.
खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं, तर अमावस्येच्या रात्री वातावरणातील ऊर्जा स्थिर आणि शांत असते. त्या वेळेला ध्यान, जप आणि पूजन केल्यास त्याचा परिणाम अधिक सकारात्मक होतो. त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी ही रात्र अत्यंत शुभ मानली जाते.
दिवाळी म्हणजे “अंधारावर प्रकाशाचा विजय”. लक्ष्मीपूजनाच्या रात्री आपण केवळ धनाची नव्हे तर ज्ञान, प्रेम, शांतता आणि समाधान या सर्व स्वरूपातील संपत्तीची आराधना करतो.म्हणूनच, अमावस्येच्या रात्री लक्ष्मीपूजन केलं जातं, अंधारातून उजेडाकडे नेणारी रात्र म्हणजे दिवाळी अशी मान्यता आहे.
हिंदू संस्कृतीत दिवाळी हा फक्त आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण नाही, तर तो आध्यात्मिक आणि ऊर्जेच्या शुद्धीकरणाचं प्रतीक आहे. या सणातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन, जो दरवर्षी कार्तिक अमावस्येच्या रात्री साजरा केला जातो. या दिवसाला देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते, असं मानलं जातं.
अमावस्या म्हणजे पूर्ण अंधाराची रात्र, ज्यात चंद्र नसतो. अंधार म्हणजे नकारात्मकता, आळस आणि अज्ञान याचं प्रतीक. या अंधारावर दिव्यांच्या प्रकाशाने विजय मिळवणे म्हणजेच दिवाळी साजरी करण्यामागचं तत्त्वज्ञान आहे. लक्ष्मी म्हणजे समृद्धी, संपत्ती आणि सकारात्मकतेचं प्रतीक. म्हणूनच लोक आपल्या घरांना स्वच्छ ठेवून, दिवे लावून देवीचं स्वागत करतात, जेणेकरून तिचं आगमन होईल आणि घरात आनंद, शांती, धन व यश नांदेल.लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त धनलाभ नव्हे, तर मनःशांती, कुटुंबातील एकता, आणि चांगल्या ऊर्जेचं आवाहन. अंधाऱ्या अमावस्येच्या रात्री जेव्हा घराघरात दिव्यांचा प्रकाश पसरतो, तेव्हा तो केवळ प्रकाश नसतो, तर समृद्धीचं, श्रद्धेचं आणि आशेचं प्रतीक असतो.म्हणूनच लक्ष्मीपूजन अमावस्येलाच केलं जातं.कारण त्या दिवशी आपण अंधारावर प्रकाशाचा, दु:खावर आनंदाचा आणि दारिद्र्यावर समृद्धीचा विजय साजरा करतो. अमावस्येला नकारात्मकपणे न पाहता त्याची चांगली बाजू देखील लक्षात घ्यायला पाहिजे.