कोण आहे असरानी यांची पत्नी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता असरानी यांनी दिवाळीच्या दिवशी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दिवाळीच्या दिवशी दुपारी ३ ते ३:३० च्या दरम्यान असरानी यांचे निधन झाले. त्यांच्या व्यवस्थापकाने सांगितले की त्यांना चार दिवसांपूर्वी आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. असरानी यांच्या पश्चात त्यांची पत्नी आहे आणि त्यांना मुलंबाळं नाहीत.
असरानी यांनी त्यांच्या पत्नीला त्यांच्या अंतिम इच्छा सांगितल्या होत्या आणि त्यानुसार, अभिनेत्याचा अंत्यसंस्कार अतिशय शांत आणि संयमी पद्धतीने करण्यात आला. असरानी यांच्या पत्नीचे नाव मंजू असरानी आहे, त्या एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. असरानी यांच्याशी लग्न करण्यापूर्वी मंजू यांचे नाव मंजू बन्सल होते आणि त्या त्याच नावाने प्रसिद्ध होत्या. त्यांना असरानी यांच्यासह अनेक चित्रपटात काम केले आहे.
७० च्या दशकातील अभिनेत्री
मंजू बन्सल या ७० च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत आणि त्यांनी असरानीसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ८० च्या दशकापर्यंत मंजू बन्सल या चित्रपटांमध्ये सक्रिय राहिल्या, नंतर त्यांनी स्वतःला अभिनयापासून दूर केले. त्या केवळ अभिनयापासून दूर राहिल्या नाहीत तर लोकांच्या नजरेपासूनही अनेक वर्ष दूर राहिल्या.
Govardhan Asrani Passed Away : एक-दोन नव्हे तर तीन पिढ्यांना हसवणाऱ्या असरानी यांचे निधन
असरानी आणि मंजू यांची लव्ह स्टोरी
“आज की ताजा खबर” आणि “नमक हराम” मध्ये एकत्र काम केल्यावर असरानी आणि मंजू एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर असरानी आणि मंजू बन्सल यांनी लग्न केले. लग्नानंतरही मंजूने चित्रपटांमध्ये काम सुरूच ठेवले. त्यांनी ‘चंदी सोना’, ‘तपस्या’, ‘जान-ए-बहार’, ‘जुर्माना’, ‘नानायक’, ‘सरकारी मेहमन’ आणि ‘चोर सिपाही’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. मंजू आणि असरानी हे कित्येक वर्ष एकत्र होते. मात्र कधीही लोकांच्या नजरेत हे कपल आले नाही. कोणत्याही पार्टी वा अन्य ठिकाणी कधीही या कपलने हजेरी लावलेली पहायला मिळाले नाही.
बरेच वर्ष एकत्र काम
असरानी आणि मंजू बन्सल हे दिग्दर्शकदेखील होते. १९९० च्या दशकात, मंजू बन्सल, ज्यांना मंजू असरानी म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यानंतर मात्र त्यांनी चित्रपटांपासून स्वतःला दूर केले. असरानी यांच्या निधनानंतर, कुटुंबात फक्त त्यांची पत्नी, बहीण आणि भाचा राहिले आहेत. असरानी आणि मंजू यांना स्वतःचे मूल नव्हते. असरानी यांचा भाचा त्यांचा आधार होता.