Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: जळगाव हादरले!!! नर्मदा नदी पात्रात बाप- लेक बुडाले, बापाचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता

Jalgaon News: जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खडके गावातील गणेश शांताराम पाटील आणि त्यांचा ११ वर्षांचा मुलगा लकी हे जबलपूरजवळ नर्मदा नदीत बुडाले. या दुर्घटनेत गणेश पाटील यांचा मृतदेह बचाव पथकाला सापडला असून लकी अद्याप बेपत्ता आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 29, 2026 | 02:35 PM
Jalgaon News: जळगाव हादरले!!! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: जळगाव हादरले!!! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नर्मदा नदीत पिता-पुत्र बुडाले
  • वडिलांचा मृतदेह सापडला
  • ११ वर्षीय लकीचा शोध सुरू
जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यमधील एरंडोल तालुक्यातील खडके गावातील एका कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. जबलपूर परिसरात नर्मदा नदीत घडलेल्या दुर्दैवी घटनेत पिता-पुत्र वाहून गेले. यामध्ये वडील गणेश शांताराम पाटील (३६) यांचा मृतदेह बचाव पथकाला सापडला आहे. मात्र त्यांचा ११ वर्षांचा मुलगा लकी गणेश पाटील याचा अजूनही ठावठिकाणा लागलेला नाही. मुलाचा शोध घेण्यासाठी नदीपात्रात मोहीम सुरू आहे. Jalgaon News:

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, खडके गावातील पाटील कुटुंबासह परिसरातील काही कुटुंबे १९ ऑगस्ट रोजी जबलपूरजवळ नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या एका आश्रमात गेले होते. सुनील महाराज उर्फ सोनू महाराज यांच्या या आश्रमात नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांसाठी अनेक वर्षांपासून अन्नदान केले जाते. याच कारणामुळे परिसरातील अनेक भाविक या ठिकाणी भेट देतात.

सर्वजण नदीत स्नान करण्यासाठी गेले होते. आंघोळ झाल्यानंतर लकी नदीच्या बाहेर आला. त्यानंतर काही वेळाने त्याच्या पायाला माती लागल्याचे त्याला जाणवले. ती माती काढण्यासाठी तो पुन्हा पाण्याजवळ गेला. पाय धुण्यासाठी तो नदीच्या प्रवाहाच्या दिशेने पुढे गेला असता अचानक त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला.

बचाव पथकाने नदी परिसरात शोध सुरू

नदीचा प्रवाह वेगात असल्याने लकीला स्वतःला सावरण्याची संधी मिळाली नाही. तो पाण्यासोबत वाहून जाऊ लागला. मुलगा संकटात असल्याचे पाहताच वडील गणेश पाटील यांनी क्षणाचाही विचार न करता त्याला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र, पाण्याचा जोर इतका जास्त होता की गणेश पाटील यांनाही प्रवाहासोबत वाहत जावे लागले.

Farmers Crisis: पावसाने दिली हुलकावणी; सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात, तातडीच्या मदतीची मागणी

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने नदी परिसरात शोध सुरू केला. काही काळाच्या प्रयत्नानंतर गणेश पाटील यांचा मृतदेह शोधण्यात यश आले. मात्र लकीचा अद्याप शोध लागलेला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाकडून नदीच्या परिसरात प्रयत्न सुरू आहेत.

मुलाचा अद्याप पत्ता  नाही..

या घटनेची बातमी खडके गावात पोहोचताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. एका क्षणात घडलेल्या या दुर्घटनेने पाटील कुटुंबाचे आयुष्यच बदलून गेले आहे. वडिलांचा मृत्यू आणि मुलाचा अद्याप न लागलेला पत्ता यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा आघात झाला आहे. गावातील नागरिकही कुटुंबाच्या या कठीण प्रसंगी त्यांच्या सोबत उभे आहेत.

Jalgaon Crime: घाबरवण्यासाठी केला हवेत गोळीबार; व्हिडिओ काढल्याने …

Web Title: Jalgaon father son drown in narmada river

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • crime news in marathi
  • Jalgaon News
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Jalgaon News: ठेचा-भाकरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठणार! गिरणेच्या पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा
1

Jalgaon News: ठेचा-भाकरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठणार! गिरणेच्या पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ
2

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ

Jalgaon News: ‘जलतारा’च्या विकासकामांना मंजुरी मिळणार? आमदार अमोल पाटलांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी
3

Jalgaon News: ‘जलतारा’च्या विकासकामांना मंजुरी मिळणार? आमदार अमोल पाटलांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी

Saurabh Katiyar Appointed MPSC Secretary: सौरभ कटियार यांच्याकडे MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार
4

Saurabh Katiyar Appointed MPSC Secretary: सौरभ कटियार यांच्याकडे MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.