Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karad Flyover Opening: घाईगडबडीत अपघातांना आमंत्रण? कराड उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या हालचालींवर नागरिक संतापले

पावसाळा तोंडावर असताना उड्डाणपुलावरील पाण्याचा निचरा हा महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. वाहतुकीसाठी खुली करण्याच्या तयारीत असलेल्या लेनवर पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक वॉटर आउटलेट्सची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. पुलावरील चढ-उतारांमुळे काही ठिकाणी पाणी साचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 06, 2026 | 11:38 AM
Karad Flyover Opening: घाईगडबडीत अपघातांना आमंत्रण? कराड उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या हालचालींवर नागरिक संतापले
Follow Us
Follow Us:
  • अनेक भागांमध्ये दुभाजकांची कामे अजूनही अर्धवट आहेत
  • हॉटेल ग्रीन पार्क ते कृष्णा हॉस्पिटलपर्यंत लाईट्स आहेत, पण त्यापुढे कोयना पुलापर्यंतचा रस्ता पूर्णपणे अंधारात
  • संरक्षक कठड्यांवर आवश्यक रंगकाम आणि परावर्तक चिन्हांची उभारणी झालेली नाही
Karad Flyover Opening: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड येथील बहुप्रतिक्षित सहा पदरी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या हालचालींना वेग आला असला, तरी पुलावरील सुरक्षाविषयक आणि तांत्रिक कामे अद्याप अपूर्ण असल्याने वाहनधारक व नागरिकांमधून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. सातारा-कोल्हापूर दिशेची एक लेन सुरू करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू असताना, सुरक्षिततेच्या निकषांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सामाजिक माध्यमांवर उड्डाणपूल २० जूनला वाहतुकीसाठी खुला होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत, परंतु, याबाबत कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुलावरील प्रत्यक्ष स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुलाच्या अनेक भागांमध्ये दुभाजकांची कामे अपूर्ण आहेत, स्ट्रीट लाईटची व्यवस्था पूर्ण झालेली नाही, संरक्षक कठड्यांवर आवश्यक रंगकाम आणि परावर्तक चिन्हांची उभारणी झालेली नाही. त्यामुळे अशा स्थितीत वाहतूक सुरू करणे धोकादायक ठरू शकते, अशी प्रतिक्रिया वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे.

कोयना प्रकल्पाच्या दुरुस्तीचा फटका; शिरगाव-मुंढे गावांवर पाणीटंचाईचे संकट, ग्रामपंचायतींना पर्या

सध्या कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक नांदलापूर परिसरातून उड्डाणपुलावर आणून सातारा-कोल्हापूर लेनवरून मार्गस्थ करण्याचा विचार सुरू आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुरक्षात्मक उपाययोजना अद्याप पूर्णत्वास गेलेल्या नाहीत. त्यामुळे वाहतूक सुरू झाल्यानंतर अपघात अथवा अन्य अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाहनधारकांचे म्हणणे आहे की, उड्डाणपूलाची रचना अत्यंत दर्जेदार असून, भविष्यात वाहतुकीसाठी तो मोठा दिलासा ठरणार आहे. मात्र केवळ वेळापत्रक पूर्ण करण्यासाठी किंवा घाईगडबडीत वाहतूक सुरू करण्याऐवजी सर्व कामे पूर्ण झाल्यानंतरच तो नागरिकांच्या सेवेत द्यावा. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी जोर धरत आहे.

सध्या काही भागात रस्त्यावरील पांढरे पट्टे आणि लाल-पांढरे रिफ्लेक्टर बसवण्याचे काम सुरू आहे. मात्र कृष्णा हॉस्पिटलनंतरच्या भागात स्ट्रीट लाईट, चेतावणी व्यवस्था आणि अन्य सुरक्षात्मक उपाययोजना अद्याप दिसून येत नाहीत. त्यामुळे केवळ रिफ्लेक्टर बसवून सुरक्षिततेची पूर्तता होणार नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

अंधारात वाहतुकीचा धोका

हॉटेल ग्रीन पार्क ते कृष्णा हॉस्पिटल या टप्प्यापर्यंत स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात आली असली, तरी त्यापुढे कोयना पुलापर्यंतचा मोठा भाग अद्याप अंधारात आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावर वाहतूक सुरू झाल्यास वाहनचालकांसाठी गंभीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुभाजक आणि संरक्षक यंत्रणाच अपूर्ण

नांदलापूरपासून पुढे अनेक ठिकाणी दुभाजकांचे काम पूर्ण झालेले नाही. काही भागांत दुभाजक उभारण्यात आलेलेच नसल्याचे दिसून येते. मुख्य पुलावरील अनेक संरक्षक भिंती व कठडेही अपूर्ण अवस्थेत आहेत. वेगवान वाहतुकीच्या दृष्टीने ही परिस्थिती धोक्याची घंटा मानली जात आहे.

देहूत आषाढी वारीच्या तयारीचा आढावा; विभागीय आयुक्तांनी सुरक्षा, वाहतूक अन् सुविधांची केली

दुसऱ्या लेनचे एक्सपान्शन जॉइंट अद्याप रखडले

कोल्हापूर-सातारा मार्गिकेवरील एक्सपान्शन जॉइंटचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. संबंधित काम सुमारे ७५ टक्क्यांपर्यंत झाल्याची माहिती मिळते. अशा स्थितीत समांतर लेनवर वाहतूक सुरू झाल्यास काम आणि वाहतूक यांचा मेळ साधणे कठीण होऊ शकते. काही भागांतील संरक्षक कठड्यांची कामेही बाकी असल्याचे निदर्शनास येत आहे.

कोयना पुलाशी जोडणीचे काम अद्याप प्रलंबित

उड्डाणपुलाच्या शेवटच्या टप्प्यात, हॉटेल अमित परिसरात जुन्या कोयना पुलाशी जोडणी करण्यासाठी आवश्यक भरावाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. दोन्ही बाजूंनी नव्याने उभारलेले कोयना पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले झाल्यानंतरच ही जोडणी शक्य होणार आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या टप्प्यातील कामे अद्याप सुरुवातीच्या अवस्थेत असल्याचे दिसून येते.

पावसाळ्यात पाण्याचा निचरा कसा होणार?

पावसाळा तोंडावर असताना उड्डाणपुलावरील पाण्याचा निचरा हा महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. वाहतुकीसाठी खुली करण्याच्या तयारीत असलेल्या लेनवर पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक वॉटर आउटलेट्सची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. पुलावरील चढ-उतारांमुळे काही ठिकाणी पाणी साचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. फक्त रिफ्लेक्टर लावून सुरक्षितता पूर्ण होत नाही.

सूचनाफलकांचा अभाव

नांदलापूर ते कोयना पूल या सुमारे पाच किलोमीटरच्या पट्ट्यात वेगमर्यादा, वळण, चढ-उतार, धोक्याची सूचना अथवा दिशा दर्शवणारे फलक मोठ्या प्रमाणात अनुपस्थित आहेत. नवीन मार्गावर प्रथमच प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी ही बाब अडचणीची ठरू शकते.

नवीन कोयना पूल खुला; प्रश्न मात्र कायम

सातारा–कोल्हापूर लेनवरील नव्याने उभारण्यात आलेला कोयना पूल अलीकडेच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र पुलावरील काही तांत्रिक कामे, विशेषतः एक्सपान्शन जॉइंटचे काम पूर्ण होण्यापूर्वीच वाहतूक सुरू करण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

वाहतुकीचे तात्पुरते नियोजन

उड्डाणपुलाच्या भरावाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक पाटण तिकाटणे परिसरातून नव्या कोयना पुलावर वळविण्यात आली आहे. माऊली हॉटेल आणि पलाश मल्टीपर्पज हॉलसमोर बॅरिकेड्स उभारून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.

नागरिकांची स्पष्ट भूमिका
उड्डाणपूल हा कराडच्या वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा असला, तरी तो पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतरच वाहतुकीसाठी खुला करावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. उद्घाटनाची घाई नको, सुरक्षिततेची खात्री हवी, अशी भावना वाहनधारकांकडून व्यक्त केली जात असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

 

Web Title: Karad flyover update unfinished safety work sparks concerns ahead of june 20 opening

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • Monsoon 2026
  • Satara News

संबंधित बातम्या

मालतपूरमध्ये संतापाचा उद्रेक; डंपर अपघातानंतर रास्ता रोको, प्रशासनाविरोधात जनआक्रोश
1

मालतपूरमध्ये संतापाचा उद्रेक; डंपर अपघातानंतर रास्ता रोको, प्रशासनाविरोधात जनआक्रोश

महाराष्ट्र कृषी सेवा अंतिम गुणवत्ता यादी रखडली; MPSC च्या दिरंगाईचा उमेदवारांना पुन्हा फटका
2

महाराष्ट्र कृषी सेवा अंतिम गुणवत्ता यादी रखडली; MPSC च्या दिरंगाईचा उमेदवारांना पुन्हा फटका

शेखर चरेगांवकर यांचा जामीन फेटाळला, सरकारी वकिलांच्या परखड युक्तिवादानंतर न्यायालयाचा निर्णय
3

शेखर चरेगांवकर यांचा जामीन फेटाळला, सरकारी वकिलांच्या परखड युक्तिवादानंतर न्यायालयाचा निर्णय

Satara News: नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवले तर फोडणार! कराड पंचायत समितीच्या सभेत सदस्यांचा महावितरणला थेट इशारा
4

Satara News: नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवले तर फोडणार! कराड पंचायत समितीच्या सभेत सदस्यांचा महावितरणला थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.