मुंबईमधील कर्नाक पूलला सिंदूर पूल नाव देण्यात आले असून सीएम फडणवीस उद्घाटन करणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
Sindoor Bridge News : मुंबई : भारतीय सैन्याने दोन महिन्यांपूर्वी भारतीय सैन्याची ताकद जगाला दाखवून दिली आहे. पहलगाम हल्ल्याचे उत्तर ऑपरेशन सिंदूर करुन नव्या भारताच्या हिंमतीची जाणीव करुन दिली. भारतीय सैन्याच्या या ऑपरेशनवरुन अनेकांनी त्या काळामध्ये जन्मलेल्या आपल्या मुलांची नावे देखील हटके ठेवली आहेत. आता भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रतिक म्हणून मुंबईतील एका पुलाला सिंदूर असे नाव देण्यात येणार आहे. या पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
मुंबईत लवकरच सार्वजनिक वाहतुकीसाठी एक नवीन पूल खुला केला जाणार आहे. मध्य रेल्वेवरील धोकादायक ठरवून कर्नाक पूल पाडण्यात आला होता. याजागी नवा पुल उभारल्यानंतरही त्याचे उद्घाटन रखडले होते. पुलाला नाव न दिल्यामुळे त्याचे उद्घाटन रख़डले होते. यानंतर आता या पुलाला ‘सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. हा पूल 154 वर्षे जुन्या कर्नाक पुलाच्या जागी बांधण्यात आला आहे. हा कर्नाक पूल नोव्हेंबर २०२२ मध्ये असुरक्षित आढळल्यानंतर पाडण्यात आला होता. त्यानंतर आता नवीन पुल बांधण्यात आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मध्य रेल्वेवरील मस्जिद बंदर जवळी हा कर्नाक पुल हा पुल उभारण्यास प्रदीर्घ काळ लागला. यामुळे प्रवासी आणि स्थानिकांचे मोठे हाल होत होते. त्यानंतर हा पुल तयार होऊनही त्याचे उद्घाटन होत नसल्याने स्थानिक नागरिकांच्या वतीने शिवसेना आणि मनसेने येथे आंदोलन केले होते. आता कर्नाक ब्रिजचे नामकरण विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मागणीनुसार ऑपरेशन सिंदुरवरुन ऑपरेशन सिंदुर पूल असे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुलाचे उद्घाटन आता येत्या गुरुवारी 10 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबईतील हा नवीन पूल केवळ वाहतुकीचा मार्ग नाही तर ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ देशभक्ती आणि धैर्याचे एक उदाहरण आहे. हा पूल मुंबईच्या ऐतिहासिक वारशात एक नवा अध्याय जोडणार आहे. ऑपरेशन सिंदूरचा उद्देश देशात शांतता आणि सुरक्षा पुनर्संचयित करणे हा होता. ही कारवाई जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाविरुद्ध भारताच्या निर्णायक कारवाईचे प्रतीक मानली जात आहे. “सिंदूर” हे नाव भारतीय संस्कृतीतील शक्ती आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. आता मुंबईमधील पुलाला देखील हे नाव देखील देण्यात आले आहे.
मुंबईतील आमदार निवासामध्ये अन्नावरुन वाद
आकाशवाणी मुंबई आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना ते असलेल्या रुममध्ये जेवणही पुरवण्यात आलं. मात्र जेवणात देण्यात आलेलं वरण आणि भात हे शिळ होतं व त्याचा वास येत होता असा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी केला. कॅन्टीन चालकांला त्यांनी वास देखील घ्यायला लावला. या पूर्वीही मी कॅन्टीनमधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केली असल्याचे संजय गायकवाड सांगितलं तसेच कोणीही जेवणाचं बील देऊ नये , मी विधीमंडळाच्या सभागृहात हा मुद्दाम उचलणार असल्याचे देखील संजय गायकवाड म्हणाले आहेत.