मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मांना दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या घरगुती हिंसाचार तक्रारीच्या सुनावणीवर न्यायालयाने या सूचना केल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत, गेल्या अनेक महिन्यांपासून घराचा हफ्ता भरलेला नाही, त्यामुळे १५ लाख रुपये मिळावे यासाठी हायकोर्टात जाणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. मात्र आता करुणा मुंडे यांच्या मुलाने आईबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. इन्स्टाग्रामवरी त्याच्या पोस्टने खळबळ माजली आहे.
माझे वडील सर्वोत्तम नसले तरी ते नुकसान पोहोचवणारे नाहीत असं विधान धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचा मुलगा सिशिव मुंडे याने केले आहे. वडील आईसोबत कठोर वागले असले तरी ते आमच्या सोबत तसे वागले नाहीत, असा दावा सिशिवने इन्स्टाग्राम स्टोरीमधून केला आहे. त्यामुळे आता मुंडे कुटुंबातल्या या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाला सिशिव?
“मी सीशिव धनंजय मुंडे आहे आणि मला बोलण महत्वाचे वाटते कारण मिडिया माझ्या कुटुंबाला मनोरंजनाचे साधन बनवत आहेत. माझे वडील कदाचित सर्वोत्कृष्ट नसतील, परंतु ते कधीही आमच्यासाठी नुकसान पोहोचवणारे नव्हते. तिने ज्या कौटुंबिक हिंसाचाराचा दावा केला आहे तो माझ्यावर, माझ्या बहिणीवर आणि माझ्या वडिलांवरही झाला आहे. माझ्या आईने वडिलांना मारहाण केली आणि तेव्हापासून ते निघून गेले. त्यानंतर माझ्या आईने मला आणि बहिणीला सोडून दिलं. कारण तिला आमच्याशी काही देणंघेणं नाही.
नाना पटोलेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप; सरकारलाही दिला इशारा
“२०२० पासून माझे वडील धनंजय हे माझी काळजी घेत आहेत आणि माझ्या आईला कोणत्याही आर्थिक समस्या नाहीत. माझी आई काही ना काही बहाने बनवत राहते. माझ्या आईने घरावरचं कर्ज सुद्धा फेडलेले नाही. आणि आता ती माझ्या वडिलांविरुद्ध सूडबुद्धीने लढण्यासाठी कथा रचत आहे,” असा दावा सिशिवने केला आहे.
करुणा मुंडे म्हणाल्या…
कोर्टाने पहिली बायको म्हणून मला मान्यता दिली आहे. मी लढा दिला आहे. यासाठी मोठी किंमत चुकवली आहे. गेले तीन वर्ष मी लढा देत आहे. मला करुणा शर्मा नाही तर मला करुणा मुंडे म्हणा. मी न्यायाधीश, कोर्ट आणि माझे वकील यांचे मनापासून आभार मानते. कोर्टाच्या ऑर्डरवर मी समाधानी नाही. आम्हाला महिन्याच्या खर्चासाठी 15 लाख महिन्याला हवेत. त्यामुळे मी हायकोर्टात दाद मागणार आहे.’ कौटुंबिक न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. कोर्टाने धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिला असून यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.