संग्रहित फोटो
बीड : राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असतात. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांकडूनही महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरीही अत्याचाराच्या घटना थांबताना दिसत नाही. अशातच आता बीडमधून एक मोठी घटना समोर आली आहे. एका महिलेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने गेली 16 वर्षे अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी नारायण शिंदेने एका महिलेची फसवणूक केली आहे. 2006 ते 2022 या दरम्यान तुझ्या मुलाला नोकरी लावून देतो असे आमीष दाखवून नारायण शिंदे याने सलग 16 वर्षे महिलेवर अत्याचार केले. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिली आहे. नारायण शिंदे हा नेकनूर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आणि अत्यंत जवळीक असलेला कार्यकर्ता आहे. दरम्यान या फिर्यादीमध्ये पिडीतेने आमदार धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत.
आरोपी नारायण शिंदे याने या महिलेकडून एक कोटी दहा लाख रुपये घेऊन पुण्यात फ्लॅट घेऊन देतो असे म्हणत फसवणूक केल्याचाही उल्लेख तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. तसेच याबाबत पोलीसात तक्रार केल्यानंतर तुला मारून टाकीन, माझी वरपर्यंत पोहोच आहे अशी धमकी देण्यात आल्याचे देखील महिलेने तक्रारीमध्ये म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली आहे.
१६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार
राजस्थानातील बांसवाडा जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथे अज्ञात लोकांनी १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर तिला मरण्यासाठी सोडून दिले. आरोपींनी अल्पवयीन मुलीचे अपहरण केले आणि तिला तिच्या मावशीच्या घरी नेले आणि रात्रभर तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सुरुवातीला दोन्ही आरोपी तरुणांनी अल्पवयीन मुलीला मारहाण केली, तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर, दोघेही समाधानी नसताना त्यांनी अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगात दारूची बाटलीही टाकली. यानंतर, तिला रस्त्यावर फेकले आणि तिथून पळ काढला.