Beed Crime News: बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उपाध्यक्ष नारायण शिंदे यांच्यावर एका शिक्षक महिलेनं लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नारायण शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिला शिक्षिकेने, पुण्यात फ्लॅट घेऊन देतो असे सांगून आरोपी शिंदे यांनी तिची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप पोलिसांच्या तक्रारीत केला आहे.तसेच या प्रकरणात तक्रार दाखल करू नये, यासाठी शिंदे यांनी तिला जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे नमूद केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील एका शिक्षिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे पदाधिकारी व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नारायण शिंदे यांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे प्रकरण मिटवण्यासाठी आमदार धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांनी मध्यस्थी केल्याचा दावाही संबंधितांकडून करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींमुळे बीड जिल्ह्यात राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.
ENG vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या संघाने इंग्लंडला घरच्या मैदानावर पाजलं पाणी! मालिका केली नावावर,
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, या तिघांच्या उपस्थितीत प्रकरण मिटवण्यासाठी बैठकही घेण्यात आली होती. या घडामोडींमुळे बीडमधील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपी नारायण शिंदे याने संबंधित महिलेकडून फ्लॅट मिळवून देतो असे सांगत तब्बल एक कोटी दहा लाख रुपये घेतले. मात्र, तक्रार केल्यास जीवे मारून टाकीन तसेच माझी वरपर्यंत पोहोच आहे अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी नारायण शिंदे याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
नारायण शिंदे याने एका महिलेला अत्याचार करून तिची तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी 23 ऑक्टोबर रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी नारायण शिंदे याच्या वतीने वाल्मीक कराड याने पीडित महिलेला फोन करून, “बसून प्रकरण मिटवू, आमदार धनंजय मुंडे सुद्धा बैठकीस उपस्थित राहतील” असे सांगितले. यानुसार 25 नोव्हेंबर 2023 रोजी परळी येथील कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस पीडित महिला, आरोपी नारायण शिंदे, आमदार धनंजय मुंडे, वाल्मीक कराड, अविनाश नाईकवाडे आणि बुधवंत हे उपस्थित होते.
त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आरोपी नारायण शिंदे याने केलेल्या फसवणुकीबाबत भरपाई म्हणून अडीच कोटी रुपये धनंजय मुंडे यांच्या मार्फत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, बैठकीनंतर शिंदे यांनी कोणतीही पूर्तता केली नाही. याबाबत मी वारंवार विनंती केली, तरीही त्या बैठकीस उपस्थित असलेल्या कुणीही काही दाद दिली नाही, असा गंभीर आरोप संबंधित महिलेने केला आहे.