Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sarpanch Lata Pharande scam: १६ लाख ७७ हजारांचा कथित आर्थिक गैरव्यवहार; साताऱ्याच्या खेड ग्रामपंचातीच्या सरपंचाचा घोटाळा उघड

Gram Panchayat Corruption : जावली पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने ग्रामनिधीत सुमारे १६ लाख २७ हजार १४३ रुपयांचा आर्थिक अपहार आणि सुमारे ५० हजार रुपयांची आर्थिक अनियमितता झाल्याचे नमूद केले

  • By anuradha sagar
Updated On: May 26, 2026 | 01:32 PM
Satara News, Gram Panchayat, Corruption Case, Political News,

Satara News, Gram Panchayat, Corruption Case, Political News,

Follow Us
Follow Us:
  • सरपंच लता फरांदे यांनी कथित १६ लाख ७७ हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघडकीस
  • लता फरांदे यांच्या विरोधात गेल्या काही महिन्यांपासून ग्रामस्थ आणि विरोधी गटांकडून सासत्याने तक्रारी आणि आरोप
  • गावाच्या विकासकामांसाठी मंजूर झालेल्या निधाच्या वापरातही पारदर्शकता नसल्याचे आणि नियमांचे केल्याचे उघडकीस
Sarpanch Lata Pharande Scam News : साताऱ्याच्या राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातारा शहरालगत असलेल्या तालुक्यातील सर्वात मोठ्या खेड ग्रामपंचायतीच्या सरपंच लता फरांदे यांनी कथित १६ लाख ७७ हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. खेडच्या लोकनियुक्त सरपंच लता फरांदे यांना दोषी ठरवत पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडलवार यांनी पदावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शासन परिपत्रकानुसार आवश्यक पडताळणी करून लता फरांदे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच लता फरांदे यांच्या विरोधात गेल्या काही महिन्यांपासून ग्रामस्थ आणि विरोधी गटांकडून सासत्याने तक्रारी आणि आरोप केले जात होते. ग्रामपंचायतीतील निधीचा गैरवापर, अपव्यय, कामांमध्ये अनियमितता आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचा तक्रारी प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या.खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विविध विकासकामांमध्ये ग्रामनिधीचा गैरवापर झाल्याची तक्रार पुणे येथील अभिजित खेडकर, उल्हास अग्निहोत्री, अभिषेक हरिदास तसेच खेड येथील साहिल शेख यांनी केली होती. त्यानुसार सातारा पंचायत समितीच्या तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी करून अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर केला.

Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंचे मोठे ‘राजकीय धक्कातंत्र’; आणखी एक पक्ष थेट शिंदेसेनेत विलीन होणार?

यानंतर जावली पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने ग्रामनिधीत सुमारे १६ लाख २७ हजार १४३ रुपयांचा आर्थिक अपहार आणि सुमारे ५० हजार रुपयांची आर्थिक अनियमितता झाल्याचे नमूद केले. तसेच या प्रकरणात सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी दोघेही जबाबदार असल्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला.

प्राथमिक चौकशीमध्ये फरांदे यांनी अनेक कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आढळून आले होते. त्यानंतर झालेल्या तपासात त्याहून काही आरोप अधिक गंभीर असल्याचे स्पष्ट झाले. धक्कादायक बाब म्हणजे गावाच्या विकासकामांसाठी मंजूर झालेल्या निधाच्या वापरातही पारदर्शकता नसल्याचे आणि नियमांचे केल्याचे उघडकीस आले. सरपंच लता फरांदे यांनी विकास कामाच्या निधींमध्ये तब्बल १६ लाख ७७ हजार १४३ गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले.

Punegaon Dam: पुणेगाव धरणातून मोठ्या प्रमाणात गाळ काढणार; १३६ हेक्टर जमीन होणार सुपीक

लता फरांदे यांच्या या कारनाम्यांच्या पार्श्वभूमीव विभागीय आयुक्तांनी फरांदे यांना पदावरून निलंबित करण्याच आदेश दिला. फरांदे यांच्याबाबत घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे आता ग्रामपंचयतीच्या कारवाभावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पण कारवाईनंतर खेड तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना सुरूवात झाली आहे. नव्या शैक्षणिक आणि राजकीय घडामोडींच्या काळातच थेट सरपंचांवर निलंबनाची ही मोठी कारवाई झाल्यामुळे खेड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. या कथित घोटाळ्यात आणखी काही अधिकारी किंवा सदस्यांचा सहभाग आहे का, यादृष्टीने आता स्थानिक पातळीवर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

 

 

 

Web Title: Khed gram panchayat sarpanch disqualified satara lata pharande scam news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • gram panchayat
  • Satara News
  • Satara Politics
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

ऊसाला हमीभाव देण्यापेक्षा साखरेला हमीभाव द्या; ना कर्जमाफीची गरज भासेल, ना साखर दराची चिंता राहील
1

ऊसाला हमीभाव देण्यापेक्षा साखरेला हमीभाव द्या; ना कर्जमाफीची गरज भासेल, ना साखर दराची चिंता राहील

कराड MIDC तील प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
2

कराड MIDC तील प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Satara News: पाणी द्या, नाहीतर गाव सोडावं लागेल! बनगरवाडीतील शेतकऱ्यांची सरकारकडे आर्त मागणी
3

Satara News: पाणी द्या, नाहीतर गाव सोडावं लागेल! बनगरवाडीतील शेतकऱ्यांची सरकारकडे आर्त मागणी

Satara News : जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर किशोर सोनवणे यांचे उपोषण अखेर मागे
4

Satara News : जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर किशोर सोनवणे यांचे उपोषण अखेर मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.