मुंबई : एआरएस घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची दादर पोलिसांकडुन चौकशी करण्यात आली. यावरुन भाजप नेते किरिट सौमय्या यांनी किशोरी पेडणेकरांवर आरोप केले आहे. या आरोपांना किशोरी पेडणेकरांनी प्रत्त्युत्तर दिलंय, विरोधातील नेत्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टिका त्यांनी केली आहे. ज्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला गेला, ते भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले. हा बेगडीपणा मला कधीही जमलेला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
[read_also content=”एसआरए घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांची मुंबई पोलिसांकडुन चौकशी https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai-police-interrogates-kishori-pednekar-in-sra-scam-case-nrps-339884.html”]
बहुचर्चित एसआरए घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच नाव आलं होतं. आज पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.