मुंबई- आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे, तर कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे. तसेच मान्सून परतीच्या मार्गावर असून, राज्यातील काही भागात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दोन सामने होणार आहेत. इंग्लंड विरुद्ध बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. इंग्लंड आणि श्रीलंकेसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
दिवसभरातील महत्त्वाचे काय…
राष्ट्रवादीची पुढील सुनावणी 9 नोव्हेंबरला, बहुसंख्य आमदार कोण ते सांगा? निवडणूक आयोगाने आकडा तपासावा, शरद पवार गटाची मागणी आहे, तर आता राष्ट्रवादी कोणाची याबाबत पुढील सुनावणी 9 नोव्हेंबरला होणार आहे.
देशात पाच राज्यात निवडणुका होणार आहेत, याची काल तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केलीय
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे
दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट व ठाकरे गट पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. तर ऐतिहासिक मेळावा पुन्हा एकदा दसरा मेळावा मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली होईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
राज्यातील टोलनाक्यावरील वसुलीच्या विरोधात राज ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर राज्यभरात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काल पोलिसांनी त्यांना धरपकड सुरु केले आहे
आज मंगळवारी मुंबई – पुणे द्रुगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे
आज विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दोन सामने होणार आहेत. इंग्लंड विरुद्ध बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. इंग्लंड आणि श्रीलंकेसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण या संघानी पहिला सामना गमावला आहे.
काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने दुसरा सामना जिंकत नेदरलँडला ९९ धावांनी पराभूत केले.
कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे.
मान्सून परतीच्या मार्गावर असून, राज्यातील काही भागात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री यांचे मंगळवार दि.१० ऑक्टोबर, २०२३ रोजीचे कार्यक्रम
दुपारी १२.३० वा.
राज्य मंत्रीमंडळ बैठक.
● स्थळ :- मंत्रीमंडळ सभागृह, ७ वा मजला, मंत्रालय, मुंबई.
सायंकाळी ०६.०० वा.
ऑलिम्पिक समितीच्या १४१ व्या अधिवेशनाच्या पूर्वतयारीबाबत बैठक.
● स्थळ :- सह्याद्री राज्य अतिथीगृह, मुंबई