गेल्या १० वर्षात सुमारे ६०० कोटींची वसुलीपात्र रक्कम वसूल करण्यात आली नसून बड्या विकासकांना मोकाट सोडण्यात आले आहे. यासंबधित उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.
कल्याण ग्रामीण भागात 65 अनधिकृत इमारती घोषित करण्यात आल्या होत्या . या सगळ्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशनुसार या समस्येवर आज बैठक घेण्यात आली.
मॉरिशसमधील मोका येथे महाराष्ट्र भवनाच्या विस्तारासाठी पायाभरणी सोहळा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. ८ कोटींचा निधी मिळाल्याने मराठी संस्कृतीच्या जतनाला चालना मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मिरा-भाईंदरकर ज्या मेट्रो सेवेसाठी अनेक वर्षांपासून वाट पाहत होते, त्या दहिसर–मिरा भाईंदर मेट्रो मार्गिकेतील महत्त्वाचे काशिगाव मेट्रो स्थानक आता वापरासाठी जवळपास पूर्णपणे सज्ज झाले आहे.
ठाणे-मुलुंड दरम्यान उभारण्यात येणाऱ्या नव्या रेल्वे स्थानकाला ‘आनंद दिघे’ यांचे नाव देण्याचा ठराव ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ठाणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल
इराण इस्राईल युद्धाची झळ आता थेट ठाण्यातील भाजी बाजाराला बसू लागली आहे. आखाती देशांमध्ये होणारी शेतमालाची निर्यात पूर्णत: ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत महायुतीच्या नगरसेवकांनी यासंदर्भातील प्रस्ताव मांडला असून तो आज सर्वानुमते मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या महासभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.
बदलापूर-कर्जत रेल्वे मार्गावर नवीन मार्गिका टाकली जाणार आहे. याबाबत जास्तीत जास्त मोबदला शेतकऱ्यांना दिला जावा असमध्यरेल्वे महाव्यवस्थापक यांची भेट घेऊन प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आलं आहे.
हॉस्पीटलमधील ICU मध्ये रुग्णांची विशेष काळजी घेतली जाते. मात्र हाच ICU आता जीवावर बेतण्याचं कारण ठरला आहे. मीरा भाईंदरमधील नामांकित हॉस्पीटलचा हलर्जीपणा समोर आला असून संताप व्यक्त केला जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथे उभारण्यात आलेल्या भव्य छत्रपती शिवाजी महाराज शक्तिपीठाला महाराष्ट्र शासनाने पर्यटन आणि तीर्थक्षेत्र म्हणून ‘ब’ दर्जा मंजूर केला आहे.