Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg News: कुडाळचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मगदूम यांना ५० हजारांचा दंड; बाबल पावस्कर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात जाणार

कुडाळ येथील कथित मारहाण प्रकरणात मानवाधिकार आयोगाने तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यावर ५० हजार रुपयांचा दंड आणि इन्क्रिमेंट थांबविण्याची कारवाई केली आहे. मात्र ही शिक्षा अपुरी असल्याचा दावा करत तक्रारदार बाबल पावस्कर यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 28, 2026 | 12:43 PM
कुडाळचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मगदूम यांना ५० हजारांचा दंड; बाबल पावस्कर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात जाणार

कुडाळचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मगदूम यांना ५० हजारांचा दंड; बाबल पावस्कर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात जाणार

Follow Us
Follow Us:
  • कुडाळचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मगदूम यांना दंड
  • मात्र बाबल पावसकर दिल्ली मानव अधिकारकडे घेणार धाव
  • बाबल पावस्कर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात जाणार
 कुडाळ: कुडाळ येथे १८ जानेवारी २०२५ रोजी घडल्याचा दावा करण्यात आलेल्या कथित मारहाण प्रकरणात राज्य मानवाधिकार आयोगाने निर्णय दिल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आयोगाने तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यावर ५० हजार रुपयांचा दंड तसेच इन्क्रिमेंट थांबविण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ही शिक्षा अत्यंत अपुरी असल्याचा आरोप करत तक्रारदार बाबल पावस्कर यांनी आता थेट दिल्ली येथील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे दाद मागण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

बाबल पावस्कर यांच्या म्हणण्यानुसार, १८ जानेवारी २०२५ रोजी त्यांना कुडाळ पोलीस ठाण्यात तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी मारहाण केली होती. या घटनेविरोधात त्यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर जवळपास दीड वर्ष या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.

सिंधुदुर्ग बनणार जागतिक दर्जाचे टुरिझम हब! ‘वन स्टेट, वन डेस्टिनेशन’ उपक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उच्चस्तरीय बैठक

या प्रकरणात ७ जुलै २०२६ आणि २१ जुलै २०२६ रोजी आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यावर ५० हजार रुपयांचा दंड आणि वेतनवाढ (इन्क्रिमेंट) रोखण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले.

मात्र, या निर्णयाबाबत बाबल पावस्कर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याकडून नागरिकाशी गैरवर्तन किंवा मारहाण झाल्याचा आरोप गंभीर स्वरूपाचा असताना केवळ आर्थिक दंड आणि इन्क्रिमेंट रोखण्याची शिक्षा पुरेशी नाही. संबंधित अधिकाऱ्यावर अधिक कठोर प्रशासकीय आणि शिस्तभंगाची कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बाबल पावस्कर हे चर्मकार समाजाचे जिल्हाध्यक्ष असून त्यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडेही संबंधित अधिकाऱ्याची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बदली करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, आयोगाच्या निर्णयाविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे जाण्याचा निर्णय घेतल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या पुढील कायदेशीर लढतीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पोलीस प्रशासन आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

SINDHUDURG : युवासेनेचे अनोखे ‘पेपरविक्री केंद्र’ आंदोलन, महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Web Title: Kudal former police inspector rajendra magdum fined babal pawaskar to approach national human rights commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 12:43 PM

Topics:  

  • Kudal
  • maharashtra
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

प्रवाशाचा धक्कादायक कारनामा! धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग ओढले अन्…; लातुरातील घटना
1

प्रवाशाचा धक्कादायक कारनामा! धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग ओढले अन्…; लातुरातील घटना

Hit and Run Video: ‘हिट अँड रन’चा धक्कादायक प्रकार; काशीमीरा पोलिसांनी चालकाला वाहनासह घेतले ताब्यात
2

Hit and Run Video: ‘हिट अँड रन’चा धक्कादायक प्रकार; काशीमीरा पोलिसांनी चालकाला वाहनासह घेतले ताब्यात

Navarashtra Impact: करंजी घाटातील धोकादायक रस्त्याची दखल; ‘नवराष्ट्र’च्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाची तातडीची कारवाई
3

Navarashtra Impact: करंजी घाटातील धोकादायक रस्त्याची दखल; ‘नवराष्ट्र’च्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाची तातडीची कारवाई

Yavatmal News: दररोज होते ३६ हजार लिटर दुधाचे उत्पादन! सात टक्क्याने आवक घटली; खाजगी दूध विक्रेत्यांची संख्या मोठी
4

Yavatmal News: दररोज होते ३६ हजार लिटर दुधाचे उत्पादन! सात टक्क्याने आवक घटली; खाजगी दूध विक्रेत्यांची संख्या मोठी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.