Kurla best bus service: कुर्ल्यातील बेस्ट बस सेवा आजही बंदच, प्रवाशांची पायपीट; प्रवासासाठी 'या' मार्गांचा वापर करा
सोमवारी 9 डिसेंबर रोजी रात्री कुर्ला येथे बेस्ट बस मार्ग क्रमांक ए-332 चा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून 42 जण जखमी झाले. जखमींना भाभा हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल आणि सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातानंतर काल मंगळवारी कुर्ल्यातील बस सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. त्यानंतर आज बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी कुर्ल्यातील बेस्ट बस बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे आज देखील प्रवाशांना पायपीट करावी लागणार आहे.
कर्ला बस स्थानकातून आज अंधेरी, वांद्रे आणि सांताक्रुझसाठी कोणत्याही बस धावणार नाही. बेस्ट बस सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे. कामावर जाणारे प्रवासी तसेच शाळा कॉलेजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बेस्ट बस सेवा बंद असल्याने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोमवारी झालेल्या भीषण अपघाताचा परिणाम बस सेवेवर झाला आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
Mahavikas Aghadi News: EVM विरोधातील लढाई तीव्र होणार; महाविकास आघाडीचा मोठा निर्णय
अंधेरी, वांद्रे आणि सांताक्रुझसाठी बस सेवा बंद राहणार असली तरी देखील प्रवाशांसाठी काही पर्यायी मार्गांची सोय करण्यात आली आहे. 37, 320, 319, 325, 330, 365 आणि 446 या बस सेवा आज कुर्ला बस स्थानकातून सुरु राहणार आहेत. सांताक्रुझ स्टेशन ते कुर्ला स्टेशन हा बस मार्ग देखील सुरु राहणार आहे, मात्र यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. 311, 313 आणि 318 च्या बसेस टिळक नगर यु टर्न घेऊन कुर्ला स्टेशनला न जाता सांताक्रुझ स्टेशनला जाणार आहेत. बसमार्ग 310 बसेस टिळक नगर पुल येथे यु टर्न घेऊन बांद्रा बस स्टेशनला जाणार आहेत.
मुंबईतील कुर्ला येथे सोमवारी रात्री बसचा भीषण अपघात झाला. ही बस बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या अंतर्गत येते. कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर या ठिकाणी हा भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून 42 जण जखमी झाले. जखमींना भाभा हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल आणि सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीत धुसफूस: विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस ठाकरे-गटात वादाची ठिणगी
बेस्च बस चालक संजय मोरे यांनी मद्यपान केल्यामुळे हा अपघात झाल्याचा संशय अनेकांकडून व्यक्त केला जात होता. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस चालकाने मद्यपान केले नव्हते. मात्र चौकशीत असं समोर आलं आहे की, संजय मोरे इलेक्ट्रीक बसच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे अस्वस्थ होते. यापूर्वी संजय मोरे यांनी खासगी कंत्राटदाराच्या मॅन्युअल ट्रान्समिशन बस चालवल्या होत्या.
मात्र ते पहिल्यांदाच इलेक्ट्रीक बस चालवत होते, आणि यामुळे गोंधळून गेले होते. ऑटोमॅटिक वाहनात क्लच नसल्यामुळे बस चालवताना त्यांचा गोंधळ उडाला आणि हा अपघात झाला. संजय मोरे यांनी देखील याप्रकरणी कबुली दिली आहे. या सर्व प्रकरणानंतर संजय मोरे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना 11 दिवसांची पोलीस कोठडीही सुनवण्यात आली.