Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna Jalgaon Railway: जालना-जळगाव अजिंठा रेल्वे मार्गासाठी भूसंपादन वेगवान; प्रशासनाकडे २५० अर्ज दाखल

जालना-जळगाव १७७ किमीच्या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी १४० हेक्टर जमिनीचे भूसंपादन सुरू आहे. या प्रक्रियेवर हरकती घेण्याची आज ८ जून रोजी अंतिम मुदत असून आतापर्यंत २५० हून अधिक शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 08, 2026 | 04:50 PM
जालना-जळगाव अजिंठा रेल्वे मार्गासाठी भूसंपादन वेगवान (Photo Credit- X)

जालना-जळगाव अजिंठा रेल्वे मार्गासाठी भूसंपादन वेगवान (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • जालना-जळगाव अजिंठा रेल्वे मार्गासाठी भूसंपादन वेगवान
  • हरकती नोंदवण्याची आज अंतिम मुदत
  • प्रशासनाकडे २५० अर्ज दाखल
अजिंठा (वा.): जालना-जळगाव या महत्त्वाकांक्षी प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेशी संबंधित हरकती दाखल करण्यासाठी आठ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत भूसंपादन विभागाकडे २५० हरकत अर्ज प्राप्त झाले आहेत. हरकती दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर सुनावणी होणार असून त्यानंतर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. जालना-जळगाव या १७७ किलोमीटर लांबीच्या, अजिंठा लेणी रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यासाठी जालना जिल्ह्यात भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे.

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), भोकरदन उपविभागीय अधिकारी यांना सक्षम प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे. बदनापूर तालुक्यातील आठ, जालना तालुक्यातील एक आणि भोकरदन तालुक्यातील १६ गावांतून हा मार्ग जाणार आहे. त्यामुळे या २५ गावांमधील सुमारे १४० हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन केले जाणार आहे. प्रकल्पाअंतर्गत जालना तालुक्यातील एक आणि बदनापूर तालुक्यातील आठ गावांतील जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर रेल्वे विभागाकडून ३० मार्च २०२६ ला प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून संबंधितांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक
शेतक-यांनी जमिनीची मोजणी, क्षेत्रफळ, मालकी हक्क, बांधकामे, विहिरी, बोअरवेल, फळझाडे, वनझाडे, पाइपलाइन आदी बाबींच्या नोदींबाबत हरकती नोंदवल्या आहेत. आतापर्यंत २५० हरकती प्रशासनाकडे आल्या आहेत.

प्रशासनाचा संयम सुटला! ३५ पैकी आली फक्त १ ई-बस; जूनअखेरपर्यंत बसेस न आल्यास ‘ऑलेक्ट्रा’चा करार रद्द होणार

हरकती दाखल करण्यासाठी अजून पाच दिवसांचा अवधी आहे. त्यानंतर आलेल्या सर्व हकरतीवर सुनावणी होणार आहे. जालना-जळगाव रेल्वे मार्गासाठी १४० हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन होत आहे. भूसंपादन प्रक्रियेवर जमीन मालकांना हरकती दाखल करण्यासाठी आठ जूनपर्यंत मुदत आहे. आतापर्यंत अडीचशे हरकती आल्या आहेत. मुदत संपल्यानंतर हकरतीवर गांभीर्यानुसार सुनावणी होऊन त्या निकाली काढत्या जातील.

मूल्यांकनासंदर्भात घेतल्या हरकती

शेतक-यांनी भूसंपादन होत असताना मुल्यांकन कमी केल्याची तक्रारी केल्या आहेत. मात्र, भूसंपदानची अधिसूचना प्रसिद्ध होण्यापूर्वीच्या स्थितीनुसारच शेतजमिनीवरील बाबींचे मूल्यांकन करण्यात येत आहे. अधिसूचनेनंतर शेतजमिनीवर फळबाग, नवीन बांधकामे किंवा अन्य बदल भरपाईसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे सांगण्यात आले.

उत्तर महाराष्ट्राला जोडणार रेल्वे मार्ग

जालना-राजूर-सिल्लोड-अजिंठा-जळगाव असा हा प्रस्तावित रेल्वे मार्ग आहे. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील जगप्रसिद्ध पर्यटन केंद्र अजिंठा लेणी, तीर्थक्षेत्र राजूर गणपती मंदिर, पुढे थेट दिल्ली-कोलकता मार्गाशी जोडणारा हा मार्ग आहे.

ऐतिहासिक पैठण नगरीत कचऱ्याचे साम्राज्य! ७० हजार लोकसंख्येसाठी अवघ्या २ घंटागाड्या; पावसाळ्यापूर्वी रोगराईची भीती

Web Title: Land acquisition for the jalna jalgaon ajanta railway line accelerates 250 applications submitted to the administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Railway News

संबंधित बातम्या

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या
1

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
2

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.