Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा बळी; शेतात काम करताना शेतकऱ्याचा मृत्यू

सोमवारी दुपारी चारच्या सुमारास लक्ष्मण भंडारे शेतात काम करत असताना अचानक चक्कर येऊन कोसळले. त्यांना तातडीने औराद शहाजानी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 22, 2026 | 07:56 AM
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा बळी; शेतात काम करताना शेतकऱ्याचा मृत्यू

लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा बळी; शेतात काम करताना शेतकऱ्याचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

लातूर : गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा बसत आहे. त्यात निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतात काम करत असताना एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

लक्ष्मण दादाराव भंडारे (वय ६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. लातूर आणि परिसरात एप्रिलच्या सुरुवातीपासूनच उष्णतेचा प्रकोप वाढत असून, तापमानाचा पारा ४२.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. किमान तापमानही ३१.५ अंशांवर गेल्याने रात्रदिवस नागरिक हैराण झाले आहेत. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास लक्ष्मण भंडारे शेतात काम करत असताना अचानक चक्कर येऊन कोसळले. त्यांना तातडीने औराद शहाजानी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने निलंग्याकडे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, उपचारापूर्वीच भंडारे यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, भंडारे यांचा मृत्यू हा उष्माघातामुळे झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याबाबत डॉ. मल्लिकार्जुन शंकद यांनी सांगितले की, दिवसभर उन्हात काम केल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली असावी. त्यामुळे तीव्र हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला असण्याची शक्यता असून, हा उष्माघाताचा प्रकार असल्याचे दिसते.

उष्यावर पावसाचा शिडकाव

गेल्या आठवड्यापासून राज्यात कमालीचा उकाडा जाणवत असून, मंगळवारी मात्र या उष्मावर पावसाचा शिडकाव पडला. त्यामुळे नागरिकांना किंचित दिलासा मिळाला. मंगळवारी सकाळच्या सुमारास मुंबई महानगरासह राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला.

संभाजीनगरमध्ये उष्माघात कक्षाची स्थापना

मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. तापमान ४१ अंशाच्या वर पोहोचले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत घराबाहेर पडणे अवघड होऊन बसले आहे. अशावेळी उष्माघाताची शक्यता अधिक वाढते. यामुळे पुढील धोके लक्षात घेता जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे जिल्हाभरातील ५३ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

कडाक्याच्या उन्हामुळे घसा सतत कोरडा पडतो? ‘या’ सायलेंट किलर आजारांची लागण झाल्यानंतर दिसतात गंभीर लक्षणे

Web Title: Old age man died due to heatstroke incident in latur district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 07:56 AM

Topics:  

  • Climate Change
  • Latur news
  • Weather Update

संबंधित बातम्या

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार
1

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
2

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; देशातील 16 राज्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा
3

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; देशातील 16 राज्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

Rain Update : पावसाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; 18 ऑगस्टपर्यंत राहणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
4

Rain Update : पावसाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; 18 ऑगस्टपर्यंत राहणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.