Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अब मैं कोकण आया हू! ‘या’ तालुक्यात बिबट्याचा हैदोस; आधी वासरू अन् आता थेट…

गावात मोकाट भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याचे ग्रामस्थ सांगतात. बिबट्याच्या तावडीतून भटक्या श्वानांचीही सुटका होत नसल्याने तो नियमितपणे गावात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 19, 2026 | 02:51 PM
अब मैं कोकण आया हू! ‘या’ तालुक्यात बिबट्याचा हैदोस; आधी वासरू अन् आता थेट…
Follow Us
Close
Follow Us:

संगमेश्वर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ
बिबट्याने घेतला गाईचा बळी
गावात भीतीचे आणि संतापाचे वातावरण

संगमेश्वर:  डिंगणी गावात सध्या बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून मानवी वस्तीत घुसून पाळीव जनावरांचा फडशा पाडण्याचा त्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. गावातील काळ मोहल्ला परिसरात काही दिवसांपूर्वी वासराचा बळी घेतल्यानंतर आता माजी ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन मोहिते यांच्या किमती गाईचा बिबट्‌याने फडशा (Ratnagiri) पाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या काही दिवसांत घडलेल्या या दोन घटनांमुळे गावात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

घरालगतच्या गोठ्यात इतर गुरांसोबत वावरत असताना बिबट्‌याने अचानक झडप मारून गाईचा फडशा पाडला. हल्ल्यावेळी इतर जनावरे जीवाच्या आकांताने सैरावैरा पळाली. शिक्षण घेतले, कष्ट केले, संसार उभा करण्यासाठी जनावरे विकत घेतली; पण त्यावरच संकट आले तर जगायचे कसे? असा संतप्त सवाल सुदर्शन मोहिते यांनी उपस्थित केला आहे. एका किमती दुभत्या गाईच्या मृत्यूमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून दुग्ध व्यवसायावरच घाला बसला आहे.

निवडणुकीची रणधुमाळी संपली, बिबट्याची दहशत कायम; नवनिर्वाचित प्रतिनिधींसमोर मोठे आव्हान

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

गावात मोकाट भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याचे ग्रामस्थ सांगतात. बिबट्याच्या तावडीतून भटक्या श्वानांचीही सुटका होत नसल्याने तो नियमितपणे गावात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. रात्रीच्या वेळी नागरिक भयभीत अवस्थेत राहत आहेत, महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून गावकऱ्यांना सुरक्षिततेची द्यावी, अन्यथा तीव आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

बचावलेल्या बिबट्यांची तपासणी बंधनकारक! वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या वन मंत्री गणेश नाईकांच्या सूचना

प्रशासनाने सीसीटीव्ही किंवा ट्रॅप कॅमेरे बसवावे

अवघ्या काही दिवसांत दोन मोठ्या घटना घडूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. वनविभागाने केवळ पंचनामा करून औपचारिकता पूर्ण न करता तातडीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावावेत, नियमित गस्त वाढवावी आणि सीसीटीव्ही किंवा ट्रॅप कॅमेरे बसवावेत, अशी जोरदार मागणी होत आहे. बाधित शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्याचीही मागणी करण्यात येत आहे.

बिबट्याची दहशत कायम

जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुराळा नुकताच संपला आहे. सत्तासंघर्षाच्या या धामधुमीत काही काळ बाजूला पडलेला बिबट्याचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच, बिबट्याने मानवी वस्तीवर केलेल्या हल्ल्यांमुळे जुन्नरकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. “मतं तर दिली, आता आमचा जीव वाचवा!” असा संतप्त सूर ग्रामस्थांमधून उमटत आहे.

Web Title: Leopard attack on cow dingni sangmeshwar forest department fear in people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Leopard
  • Leopard Attack
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Water Crisis Impact : नवराष्ट्रचा दणका! ‘तहानलेल्या गावा’ला दिलासा! कोळथरे ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठ्यासाठी नियोजन सुरू
1

Water Crisis Impact : नवराष्ट्रचा दणका! ‘तहानलेल्या गावा’ला दिलासा! कोळथरे ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठ्यासाठी नियोजन सुरू

Ratnagiri news : धरणात पाणी मुबलक, तरी कोळथरे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण; पाईपलाईन दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष?
2

Ratnagiri news : धरणात पाणी मुबलक, तरी कोळथरे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण; पाईपलाईन दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष?

Ratnagiri News: अलोरे गावच्या इर्शाद मुल्लाजींना शिवसेनेत मोठी जबाबदारी; अल्पसंख्याक तालुकाप्रमुखपदी नियुक्ती
3

Ratnagiri News: अलोरे गावच्या इर्शाद मुल्लाजींना शिवसेनेत मोठी जबाबदारी; अल्पसंख्याक तालुकाप्रमुखपदी नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.