Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Leopard CCTV Video: बिबट्याची दहशत सुरूच; देवरुखच्या साडवली परिसरातील थरारक दृश्य CCTV मध्ये, तातडीने पिंजरा लावण्याची मागणी

Leopard CCTV Video: देवरुख शहरालगतच्या साडवली-सह्याद्री नगर परिसरात पहाटे बिबट्याचा मुक्तसंचार पाहायला मिळाला. स्थानिक नागरिक भाई शिंदे यांच्या घरासमोरून फिरणारा बिबट्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या दर्शनामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बंदोबस्त करावा....

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 06, 2026 | 11:54 AM
बिबट्याची दहशत सुरूच; देवरुखच्या साडवली परिसरातील थरारक दृश्य CCTV मध्ये, तातडीने पिंजरा लावण्याची मागणी

बिबट्याची दहशत सुरूच; देवरुखच्या साडवली परिसरातील थरारक दृश्य CCTV मध्ये, तातडीने पिंजरा लावण्याची मागणी

Follow Us
Follow Us:
  • घरासमोरून आरामात फिरला बिबट्या!
  • देवरुखच्या साडवली परिसरातील थरारक दृश्य CCTV मध्ये
  • तातडीने पिंजरा लावण्याची मागणी
Leopard CCTV Video: कोकणातील काही जिल्ह्यात बिबट्यांनी चांगलीच दहशत माजविण्यास सुरुवात केली आहे. वारंवार बिबटे नागरी वस्तीत दिसू लागल्याने नागरिक भितीच्या छायेत वावरत आहेत. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखच्या साडवली-सह्याद्री नगर परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज (10 ऑक्टोबर) पहाटे परिसरातील स्थानिक नागरिक भाई शिंदे यांच्या घरासमोर बिबट्या फिरताना दिसला. हा संपूर्ण प्रकार घराबाहेर लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Leopard CCTV Video)

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

CCTV दृश्यांमध्ये बिबट्या मानवी वस्तीजवळून मोकळेपणाने फिरताना दिसत असल्याने परिसरातील रहिवाशांची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून देवरुख शहरासह लगतच्या ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळी बिबटे अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच घराबाहेर बांधलेली पाळीव जनावरे आणि अन्य प्राण्यांच्या सुरक्षेबाबत ग्रामस्थांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडतानाही नागरिकांना खबरदारी घ्यावी लागत आहे.

साडवली-सह्याद्री नगर परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार सुरू असल्याने वनविभागाने या प्रकाराची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच गरजेनुसार परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा सुरक्षित बंदोबस्त करावा, अशी मागणी साडवली आणि देवरुख परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

तसेच सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि कोकण परिसरात दूर्मिळ मानल्या जाणाऱ्या ब्लॅक पँथर अर्थात काळ्या बिबट्याच्या वावराच्या नोंदीतही वाढ झाली आहे. यामध्ये वाढती जंगलतोड, मानवी वस्तीचा विस्तार आणि अन्न – पाण्याच्या शोधात हे वन्यप्राणी जंगलातून मानवी वस्तीकडे येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. वाढत्या जंगलतोडीमुळे आणि मानवी हस्तक्षेपापायी वन्यप्राणी अन्नाच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे वळत आहेत. ते रात्रीच्या वेळी पाळीव कुत्र्यांची शिकार करत असल्याचे समोर आले आहे.

वनविभागाचे आवाहन

  • नागरिकांनी घाबरून न जाता रात्रीच्या वेळी एकटे बाहेर जाणे टाळावे.
  • पाळीव जनावरांची सुरक्षितता राखावी.
  • बिबट्या किंवा इतर वन्यप्राणी निदर्शनास आल्यास तत्काळ वन विभाग (Forest Department) संपर्क साधावा.
Leopard Attack : मध्यरात्री दबा धरून बसला अन् थेट…! सफाळ्यात बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ; ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

Web Title: Leopard spotted in sadavali sahyadri nagar near devrukh cctv video sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • Leopard
  • maharashtra
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

तिकोना गडाचा इतिहास आता क्यूआर कोडवर; पर्यटकांना मिळणार ऑडिओ स्वरूपात माहिती
1

तिकोना गडाचा इतिहास आता क्यूआर कोडवर; पर्यटकांना मिळणार ऑडिओ स्वरूपात माहिती

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप
2

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप

Jaitapur: जैतापूर अजूनही रखडलेलाच, त्यात रत्नागिरीत ४ नवे अणुप्रकल्प! नागरिकांचा संतापाचा उद्रेक
3

Jaitapur: जैतापूर अजूनही रखडलेलाच, त्यात रत्नागिरीत ४ नवे अणुप्रकल्प! नागरिकांचा संतापाचा उद्रेक

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन
4

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.